आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Triple Talaq: Muslim Law Board Says Will End Controversial Divorce Practice In A Year Or Two

तीन तलाक दीड वर्षात बंद करू; केंद्राचा हस्तक्षेप नकाे; लाॅ बोर्डाची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनोर- मुस्लिमांमध्ये घटस्फोटासाठी वापरली जाणारी तीन तलाक पद्धत येत्या दीड वर्षांत संपुष्टात आणू. या प्रश्नी सरकारने लुडबुड करू नये, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष कल्बे सादिक यांनी म्हटले आहे. सादिक यांनी मुस्लिमांना गोमांस खाऊ नका, असा सल्लाही दिला आहे.

सोमवारी एका कार्यक्रमात त्यांनी तीन तलाकबाबत मतप्रदर्शन केले. तीन तलाक महिलांसाठी अन्यायकारक आहे, मात्र हा समाजाचा अंतर्गत विषय असल्यामुळे येत्या दीड वर्षात त्यावर उपाय शोधला जाईल. केंद्र सरकारने त्यात थेट हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी सांगितले. 

मुस्लिम महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा : केंद्र
तीन तलाक, निकाह हलाल व बहुपत्नीकत्वामुळे मुस्लिम महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होत असून यामुळे मूलभूत हक्क नाकारले जातात. असुरक्षितताही यामुळे वाढत असल्याचे केंद्राने सुप्रीम कोर्टात दिलेल्या एका लेखी उत्तरात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...