आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Triple Talaq: Swami Prasad Maurya Controversial Statement, Says Men Change Wives To Fulfill Their Lust

पीएम म्हणाले, मुस्लिमांनी तीन तलाकचे राजकारण हाेऊ देऊ नये; या प्रथेविरुद्ध पुढाकार घ्यावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलबुर्गींच्या कुटुंबीयांची भेट - Divya Marathi
कलबुर्गींच्या कुटुंबीयांची भेट
नवी दिल्ली- तीन तलाकच्या मुद्द्यांकडे मुस्लिम समुदायाने राजकीय चष्म्यातून बघू नये आणि या मुद्द्यांचे राजकारण होणार नाही, याची खबरदारीही मुस्लिम समुदायाने घ्यावी, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिम समुदायातील बुद्धिजीवी लोक पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे काही दिवसांतच तीन तलाकच्या घटनात्मक वैधतेबाबत सुनावणी होणार असतानाच मोदी यांचे हे वक्तव्य आले आहे.
 
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतातील मुस्लिम जगभरातील आपल्या समुदायाला आधुनिकतेचा मार्ग दाखवतील,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिम समुदायातील प्रभावशाली लोक पुढे येतील आणि आधुनिक व्यवस्था विकसित करतील,अशी आशा भारताची महान परंपरा पाहून माझ्या मनात आहे, असे मोदी म्हणाले.

कलबुर्गींच्या कुटुंबीयांची भेट 
कार्यक्रम संपल्यानंतर मोदी प्रेक्षकांत गेले. कन्नड विचारवंत एम.एस. कलबुर्गी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मागील वर्षी कर्नाटकच्या धारवाडमध्ये कलबुर्गी यांची हत्या झाली होती. त्यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेबाबत चर्चा व पुरस्कार वापसी सुरू झाली होती.२०१८ मध्ये होणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने ती महत्वाची मानली जात आहे.
 
४० मिनिटे भाषण जातीयवाद नष्ट करण्यावर भर...
मोदींनी ४० मिनिटांच्या भाषणात महिला सबलीकरण, समता व सुशासनाबाबतचे मुद्दे मांडले. तीन तलाकच्या बाबतीत ते म्हणाले की, समुदायातील( मुस्लिम) लोकच आमच्या माता आणि भगिनींना या दुष्टचक्रातून वाचवण्यासाठी पुढे येतील, हेच आमच्या देशाच्या मातीचे सामर्थ्य आहे. या मुद्याचे राजकारण होऊ देऊ नका, असे माझे मुस्लिम समुदायातील लोकांना आवाहन आहे, असे मोदी म्हणाले.
 
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, योगीचे मंत्री तीन तलाकवर काय म्हणाले... वासना शमवण्यासाठीच पत्नी बदलतात : मौर्य

हेही वाचा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...