आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यावर पसरले 1 कोटी 20 लाख रूपयांचे नाणे, जाणून घ्या या फोटोंमागील सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- 500-1000 च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट होताना दिसत आहेत. त्यातील काही फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रस्त्यावर कोट्यावधींचे नाणे पसरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याला ब्लॅकमनी संबोधले जात आहे.

ब्लॅकमनी, व्हाईट करण्यासाठी ट्रकने दुसर्‍या ठिकाणी पाठवला जात होता, असेही काही यूजर्सनी म्हटले आहे. फोटोमध्ये रस्त्यावर ट्रक उलटल्याचे दिसत आहे. ड्रममध्ये भरलेले नाणे रस्त्यावर पसरलेले दिसत आहेत. इतकेच नव्हे तर लोक हे नाणे पळवून घेऊन जाताना दिसत आहे.

काय आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमागील सत्य...?
- दरम्यान, व्हायरल झालेले फोटो राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात आरबीआयचा एक ट्रक 1 कोटी 20 लाख रुपयांचे नाणे घेऊन निघाला होता.
- या ट्रकला उदयपूरजवळ अपघात झाला आणि ड्रमध्ये भरलेले सर्व नाणे रस्त्यावर पसरले.
- रस्त्यावर पसरलेले नाणे उचलण्यासाठी लोकांची एकच झुंबड पडली होती. काही लोकांनी तर पिशव्या भरून-भरुन नाणे पळवून नेले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोर्चा सांभाळला होता.
- पोलिसांनी रस्त्यावर पसरलेले नाणे गोळा करून त्यांची मोजदाद केली असता, ते 15 लाख रुपयेच निघाले. उर्वरित नाणे आजुबाजुच्या गावकर्‍यांनी पळवून नेल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता.
- या दुर्घटनेचा आणि नोटबंदीच्या निर्णय याचा काही एक संबंध नाही.

सोशल मीडियावर अनेक अफवा सुरु आहेत. अफवांचा एक भाग म्हणून उदरपूरमध्ये फेब्रुवारीत झालेल्या या आरबीआयच्या ट्रक दुर्घटनेचे फोटो व्हायरल झाली आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...