श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये आठ-नऊ दिवसांपूर्वी बीफ असल्याच्या संशयावरुन एका ट्रक ड्रायव्हरवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला होता, त्याचा दिल्लीत रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसा भडकली आहे. आंदोलकांनी रविवारी पोलिसांवर दगडफेक केली. टायर जाळून जम्मू-श्रीनगर हायवेवर रास्तारोको केला. या वाढत्या तणावात कट्टरपंथीयांनी सोमवारी खोऱ्यात बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, ट्रक ड्रायव्हरवर हल्ला करणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत चालकाच्या जनाजाच्या वेळीसुद्धा पोलिसांनावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.
काय आहे प्रकरण
9 - 10 ऑक्टोबर दरम्यान रात्री ट्रक ड्रायव्हर जाहिद रसूल बट काश्मीरहून उधमपूरला जात होता. त्याच्या ट्रकमध्ये बीफ असल्याच्या संशयावरुन काही लोकांनी त्याच्यावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. यात जाहिद 80% भाजला होता.
का चिघळला वाद
>> जाहिदला 11 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरहून दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. येथे रविवारी त्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
>> जाहिदच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात हिंसाचार भडकला.
>> जाहिदचे नातेवाईक मौलवी मोहम्मद अशरफ यांनी आरोप केला, की हल्ला करणारे हिंदू संघटनेचे लोक होते. त्यांनी म्हटले, जाहिदला आयसीयूमध्ये दाखल केले होते, मात्र दोन दिवसांपूर्वी त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले होते.
पुढील स्लाइडमध्ये, घटनेशी संबंधीत फोटो आणि
नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य, आतापर्यंत झालेल्या घटना