आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रात हुंड्यात मिळते ट्रकचे जुने ट्यूब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - हुंड्याच्या रूपाने अनेक प्रकारच्या गोष्टी देण्याची आपल्या देशात परंपरा आहे; परंतु आंध्र प्रदेशातील एका गावात लग्न झाले तर एक वस्तू प्रत्येक परिवाराला अनिवार्यपणे द्यावीच लागते. ती म्हणजे ट्रकचे जुने ट्यूब.

वरंगल जिल्ह्यातील हे दुर्गम गाव आहे. मंगल थांडा या गावातील ही परिस्थिती आहे. गरिबातील गरीब कुटुंबात ही पद्धत पाहायला मिळते. या विचित्र भेटवस्तूचे कारण आहे नदी. गावात जाण्याच्या मार्गावर नदी आहे. नदी पार करूनच गावात पोहोचता येऊ शकते. त्यामुळे ट्रक ट्यूबच्या साह्याने नदी पार करावी लागते. महिला-पुरुष, तरुण मंडळींना त्यावरून जावे लागते. ट्यूबने जायचे नसेल व पायी जाण्याची तयारी असेल तर पाच किलोमीटरचा रस्ता तुडवत जावे लागते. वाट्टे वागू या नदीमुळे मंगल थांडा जगापासून तुटलेले आहे. गावातील नागरिकांना रेशन, शाळा, रुग्णालय, बँक आणि इतर सर्व प्रकारच्या पायाभूत गोष्टींसाठी नदी पार करावी लागते. नागरिकांना त्यासाठी नदीतून सुरीपल्ली गावावर अवलंबून राहावे लागते. पाण्यात बुडताना ज्याप्रमाणे लाइफ जॅकेटची गरज असते. त्याप्रमाणेच येथे ट्यूबची गरज असते. ट्यूब दिले नाहीतर विवाहाची कल्पनाही करता येत नाही, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. गावची लोकसंख्या 250 च्या आसपास आहे.