आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Try Infiltration, More Militants Sighted In Area Where Twin Attacks Happened

पाकिस्तान कडून राजौरी सीमेवर गोळीबार, दुहेरी हल्ल्याच्या ठिकाणी आढळले अतिरेकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी राजौरी सेक्टर येथील भारतीय चौकीला लक्ष्यकरत गोळीबार केला. या फायरिंगच्या आडून घुसखोरी करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, भारतीय सैनिकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत थोड्या थोड्या वेळाने फायरिंगचा आवाज सुरु होता.

सांबा येथील लष्कराची छावणी आणि हिरानगर पोलिस स्टेशनवर झालेल्या दुहेरी हल्ल्यानंतर या भागात अतिरेकी आढळून आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

राजौरी येथून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौकीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यांना जशास तसे उत्तर देत भारतीय सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. रात्री या भागात सुरक्षा वाढवण्यात आली होती.

तंगधार येथे लष्कराचे ऑपरेशन सुरू
काश्मिरच्या तंगधार सेक्टरमध्ये लष्कराचे ऑपरेशन सुरू असून फायरिंगचा आवाज येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार काही अतिरेकी मारले गेले आहेत. मात्र, एकही मृतदेह हाती लागला नसल्यामुळे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.