आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ देण्याचे टीसीचे अधिकार काढले!, रिक्त बर्थ-आसन आपोआप दुसऱ्या स्थानकाकडे हस्तांतरित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी टीटीईचा आसन देण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे. आता रेल्वेमध्ये टीटीई रिक्त आसन आपल्या मर्जीनुसार अलॉट करू शकणार नाहीत. रिक्त बर्थ-आसन आपोआप दुसऱ्या स्थानकाकडे हस्तांतरित होईल. त्या स्थानकाच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ही आसने मिळतील. म्हणजे हा कोटा प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मिळणार आहे. हा नियम रेल्वेने या महिन्यापासून लागू केला आहे. यामुळे टीटीईच्या बेकायदा कमाईवर आळा बसला आहे. टीटीई आपल्या मर्जीनुसार वेटिंगची आसने जनरल तिकिटांच्या प्रवाशांसाठी देऊ करत होते. हे अधिकार तिकीट निरीक्षकांच्या अवैध कमाईचे साधन ठरले होते.
बातम्या आणखी आहेत...