आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे तुर्कीच्या बिल्डरची मुलगी, भारतामध्ये लग्न करून सुरू केले हे काम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षापासून कोटा येथे तुर्कीची रहिवासी असलेली जुलेहा ही मतिमंद मुलांची देखरेख करत आहे. - Divya Marathi
दोन वर्षापासून कोटा येथे तुर्कीची रहिवासी असलेली जुलेहा ही मतिमंद मुलांची देखरेख करत आहे.
कोटा - गेल्या दोन वर्षापासून कोटा येथे तुर्कीची रहिवासी असलेली जुलेहा ही मतिमंद मुलांची देखरेख करत आहे. जुलेहा ही तुर्कीच्या अंकरा शहरामधील 12 लाख रूपये वर्षाचे पॅकेज असलेली नोकरी सोडून भारतात आली आहे. तिचे वडिल हे बिल्डर आणि भाऊ कनाडामध्ये अभियंता आहे. 
 
अशी आली होती भारतात...
- फेसबुक फ्रेंड असणाऱ्या कलाकार सर्वेश हाड़ाने चॅटिंग करून जुलेहाला भारतामध्ये मतिमंद मुलांबद्दल माहिती सांगितली होती.
- जुलेहाने याची सुरूवात सुमारे अडिच वर्षापूर्वी सुरू केली होती. जुलेहा वेगळ्या कलाकारांना शोधत-शोधत कोटाच्या कलाकार सर्वेश हाड़ाच्या फेसबुक पेजवर पोहोचली. हळूहळू त्यांची मैत्री झाली.
- जुलेहा तुर्कीमध्ये रीहेबिलेशन सेंटरमध्ये काम करते. कोटामध्ये सर्वेशही मतिमंद असलेल्या मुलांवर काम करत होता. सर्वेशने जेव्हा जुलेहाला मंतिमंद मुलांची माहिती सांगितली त्यानंतर ती भारतात आली.
- 2015 मध्ये भारतात येऊन जुलेहाने सर्वेशसोबत लग्न केले. नंतर तिने गरजू कुटुंबांच्या मुलांची संपूर्ण काळजी घेणे आणि त्यांचे जिवन जगणे सोपे कसे होईल  यावर काम करत आहे.
 
जीवनभर सेवा करेल...
- जुलेहाने दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले की, मी कोटामध्ये अत्यंत खुश होते. 'जर्नी ऑफ बुक' च्या व्हिसा पासून प्रारंभ झालेल्या या जीवनाला आता मुलांसाठी वाहिले आहे. येथे जवळपास 800 मतिमंद मुले आहे. त्यांच्या पुनर्वसनची काहीच व्यवस्था नाही. हे मला पूर्णपणे संपावायचे आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो...