गाझियाबाद - येथील इंदिरापूरम भागातील एका शिक्षकाने इंग्रजी शिकवण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. नराधम शिक्षकाने विद्यार्थीनीची व्हिडिओ क्लिप तयार करुन तिला वेळोवेळी ब्लॅकमेल देखील केले. पोलिसांनी सोमवारी शिक्षक शफीक अहमदवर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, की विद्यार्थीनीचा आरोप आहे की शिक्षक सहा महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करीत आहे. पीडित विद्यार्थीनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अहमदच्या इन्स्टीट्यूटमध्ये दाखल झाली होती. आरोपीने तिला एकदा घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने व्हिडिओ क्लिप तयार केली. त्यानंतर अहमद व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार करत होता. या छळाने त्रस्त झालेल्या तरुणीने सर्व हकिकत आईला सांगितली आणि त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.
संग्रहित छायाचित्र - बलात्काराच्या विरोधात निदर्शने करणारे जागरुक नागिरक.