आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Channel Reportedly Talked With Wife Of Dawood

VIDEO: TV चॅनेलने केला दाऊद इब्राहिमच्या घरी फोन, बायको म्हणाली- ते झोपले आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदच्या पत्नीची मीडियाबरोबर झालेली चर्चेचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा. - Divya Marathi
दाऊदच्या पत्नीची मीडियाबरोबर झालेली चर्चेचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.
नवी दिल्ली - 22 वर्षांनंतर दाऊदचा नवा फोटो समोर आल्यानंतर शनिवारी दाऊदशी संबंधित आणखी एक खुलासा झाला. एका टिव्ही चॅनेलने पाकिस्तानातील कराचीमध्ये दाऊद इब्राहीमच्या पत्नीशी बोलल्याचा दावा केला. या चर्चेत दाऊदची पत्नी मेहजबीन कराचीमधून बोलत असल्याचे सांगते. दाऊदबाबत विचारले असता ती म्हणते, ते झोपलेले आहेत.
भारत सरकारने पाकिस्तानला देण्यासाठी पुरावे तयार ठेवले आहेत. त्यात दाऊदच्या कराचीमधील घराचे फोन बिलही आहे. त्यात त्याचा नंबर लिहिलेला आहे. त्या नंबरचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही. पण इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने शनिवारी दोन वेळा या क्रमांकावर फोन केला.

पहिला फोन : शनिवारी दुपारी 12. 25 वाजता
दाऊदच्या कराचीतील घरातून एका महिलेचा आवाज : हॅलो, अस्सलाम वलैकुम
रिपोर्टर : जी... वलैकुम अस्सलाम

रिपोर्टर : क्या मै मेहजबीन शेख से बात कर रहा हूं?
महिला : जी

रिपोर्टर : मॅडम, आप कराची से बोल रही हैं?
महिला : जी

महिला : जी, आप कौन?
रिपोर्टर : जी मॅडम, मुझे बस आपसे पूछना था कि क्या आप मिस्टर दाऊद इब्राहिम की बीवी हैं?
महिला : जी वो सो रहे हैं।
दुसरा फोन : शनिवारी दुपारी 12:38 वाजता

रिपोर्टर : हॅलो, मुझे अॅक्च्युअली दाऊद भाईजान से बात करनी है, वो हैं क्या?
महिला : पता नही बेटा, मुझे नही मालूम, आप थोडी देर बाद फोन करो.

रिपोर्टर : वो घर पर हैं क्या?
त्यानंतर फोन कट झाला.
पुढील स्लाईडवर वाचा, रॉने केला होता दाऊदचा खातमा करण्याचा प्रयत्न...