आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर उन्हात कारमध्ये बंद झाल्या 5 वर्षाच्या जुळ्या मुली, गुदमरल्याने झाला दोघींचाही मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुदमरुन मृत्यू झालेल्या हर्षा आणि हर्षिता. - Divya Marathi
गुदमरुन मृत्यू झालेल्या हर्षा आणि हर्षिता.
पटौदी (गुडगांव)- उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजी-आजोबांकडे आलेल्या 5 वर्षाच्या दोन जुळ्या मुलींचा बंद कारमध्ये गुदमरल्याने मृत्यू झाला. या कारच्या दरवाजांमध्ये काही तरी बिघाड झालेला होता. या मुली कारचा दरवाजा उघडून आत तर गेल्या पण बाहेर येऊ शकल्या नाहीत. 

काय आहे पुर्ण प्रकरण

- घटना गुडगांव येथील जमालपूरची आहे. तेथे राहणारे गोविंद सिंह हे लष्करात आहेत. सध्या ते मेरठ येथे तैनात आहेत.
- गोविंद यांच्या या दोन जुळ्या मुली आहेत. या मुली 5 वर्षाच्या असून हर्षा आणि हर्षिता अशी त्यांची नावे आहेत. 
- मंगळवारी संध्याकाळी या मुली खेळता-खेळता घराजवळ उभ्या या कारमध्ये बसल्या. त्यानंतर कारचा दरवाजा आतुन बंद झाला.

बेशुध्दावस्थेत सापडल्या मुली

- खूप वेळ या मुली न दिसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. या दोन्ही मुली कारमध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आल्या. 
- त्यांना कारमधुन कसेबसे काढून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 
- मिळालेल्या माहितीनुसार कारच्या दरवाजाचे लीवर खराब झाले होते. दरवाजा बाहेरुन तर उघडत होता पण आतुन तो उघडता येत नव्हता. त्या मुली तो दरवाजा उघडू शकल्या नाहीत. खुपच उष्णता असल्याने आणि पुरेसा ऑक्सीजन न मिळाल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. 
- या मुली मेरठ येथील केंद्रीय विद्यालयात पहिलीच्या वर्गात शिकत होत्या.
- गोविंद हे बुधवारी मेरठला परतणार होते तत्पुर्वीच मंगळवारी ही घटना घडली. 
बातम्या आणखी आहेत...