आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख वेळा पाहिला गेला या मुलीचा व्हिडिओ, दोन दिवसांमध्ये झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - इंटरनेटवर सध्या राजस्थानचा एक मारवाडी व्हिडिओ वेगाने शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्विंकल वैष्णव नावाची तरुणी राजस्थानी अंदाजात स्टँडअप कॉमेडी करताना दिसत आहे. 2016 च्या शेवटच्या दिवशी अर्थात 31 डिसेंबर रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत त्याला 1 लाख वेळा पाहिले गेले आहे. त्यासोबतच यू-ट्यूबच्या टॉप ट्रेंडमध्ये 27 व्या क्रमांकावर हा व्हिडिओ आहे. 
  
  काय आहे व्हिडिओमध्ये.. 
- व्हिडिओमध्ये ट्विंकल खास राजस्थानी अंदाजात कॉमेडी करते.
- यात ट्विंकल इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अतिशय चपखल वापर करुन विनोद निर्मिती करते. त्यासोबतच त्यांचा राजस्थानी अर्थ सांगते. 
- ट्विंकल वैष्णवचा व्हिडिओ राजस्थानी कॉमेडी शो या यू-ट्यूब चॅनलने अपलोड केला आहे. 
- हे चॅनल वेगवेगळ्या कलाकारांसोबतचे कॉमेडी शो अपलोड करत आहे. त्यांचे जवळपास 3 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहे. 
  
वेगवेगळ्या भूमिकेत दिसते ट्विंकल 
- याआधीही ट्विंकलचे अनेक शो या चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे. 
- त्यात ती कधी राजस्थानी तर कधी नव्या नवरीच्या रुपात कॉमेडी करताना दिसली आहे. 
- या वेगवेगळ्या व्हिडिओंना साधारण 5 ते 7 लाख व्ह्यूज मिळत असतात.
- हे सर्व व्हिडिओ पीआरजी म्यूझिक व्हिडिओ बॅनरखाली तयार करण्यात आले आहे.
  
पुढील स्लाइडमध्ये पाहा ट्विंकल वैष्णवचे निवडक फोटो... 
    
(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...