आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे काय घडले या मुलीसोबत की तिच्या भावांनी केला आपल्या दाजीचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खून झालेली राधिका. - Divya Marathi
खून झालेली राधिका.
राजकोट- खूनाचा बदला घेण्यासाठी आपल्या दाजींचा खून करुन त्याचा मृतदेह आईसमोर आणून ठेवल्याची घटना घडली. हा घे तुझ्या मुलीचा हत्यारा, असे या मुलांनी त्यांच्या आईला सांगितले. पोलिसांनी या खूनासंदर्भात 3 लोकांना अटक केली आहे. 

पॅरोलवर होता बाहेर 
मवडी भागातील कृष्णा पार्क या ठिकाणी 80 फूटी रस्त्यावर तिरुपती बालाजी सोसायटीत राहणाऱ्या रवी किरीटभाई वाडेसाने राधिकासोबत प्रेमविवाह केला होता. 10 महिन्यांपूर्वी 24 नोव्हेंबर रोजी रात्री जेवणाच्या बहाण्याने रवीने आपल्या पत्नीला चोटिला येथे नेले. तेथे त्याने आपल्या पत्नीचा खून केला. त्याला याप्रकरणी अटकही करण्यात आली होती. 5 दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटला होता. त्याचे 2 मेव्हणे प्रशांत आणि हर्षद यांनी आपला मित्र परमसिंह ठाकुरच्या मदतीने सोमवारी दुपारी त्याच्या घराजवळ त्याच्यावर चाकुने 18 वार करत त्याचा खून केला. त्यानंतर हा मृतदेह ते घरी घेऊन गेले आणि आपल्या आईला दाखवला. 
 
पोलिसांनी केली तिघांना अटक
खून केल्यानंतर आरोपींनी रवीचा मृतदेह पुष्करधाम येथे सोडला आणि ते फरार झाले. मालवीय नगर पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली. आरोपींनी बहिणीच्या ब्यूटीपार्लर समोर एका कारमध्ये रवीचा मृतदेह नेऊन टाकला होता. ज्या कारमध्ये राधिकाचा खून करण्यात आला त्याच कारमध्ये रवीचा खून करण्यात आला. 
 
अशा पध्दतीने केला खून
खूनाचा आरोप असलेला रवी वाडेसा हा सुरेंद्रनगर जेलमधून 5 दिवसापुर्वीच 10 दिवसाच्या पॅरोलवर सुटला होता. त्यांची माहिती प्रशांत आणि हर्षद यांना मिळाली होती. बहिणीच्या खूनाचा त्यांना बदला घ्यायचा होता. त्यांनी त्यांचा मित्र ऋषी नेपाळी याला त्याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले. रवी सोमवारी दुपारच्या वेळी स्वीफ्ट कारमधुन घरी चालला होता. त्यावेळी तिघांनी दुचाकीवरुन त्याचा पाठलाग केला. रवी घराजवळ कारमधुन उतरत असताना त्याला ्र
प्रशांत आणि हर्षद दिसले. त्यामुळे रवी पळून जाऊ लागला. परंतु तो पळताना चिखल असल्याने एका ठिकाणी घसरुन पडला. ती संधी साधत दोघा भावांनी त्यांच्यावर सपासप वार केले. त्यात रवीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह बहिणीच्या ब्यूटी पार्लरजवळ नेऊन टाकला.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...