आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात खेळणाऱ्या मुलांनी दिवसा सापाला दगड मारला, रात्री दोघा भावांना सर्पदंश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरतपूर (राजस्थान) - भरतपूर येथील एका गावात सर्पदंशाने दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. दोघे सख्खे भाऊ होते. सचिन (12) आणि बलराम (14) घरात झोपले होते तेव्हा नागाने त्यांना दंश केला. झाले असे, की दिवसा दोघे भाऊ शेतात खेळत होते तेव्हा एका सापाला त्यांनी दगड मारला होता. तेव्हा साप तिथून निघून गेला, मात्र रात्री त्याने त्या मुलांना दंश केला.
जाणून घ्या, हा बदला तर नाही ?
- भरतपूर जवळील नैवाडा गावातील ही घटना आहे. सचिन (12) आणि बलराम (14) दोघे भाऊ शेतामध्ये मित्रांसोबत खेळत होते. अचानक त्यांना साप दिसला. त्याबरोबर एकाने सापाच्या दिशेने दगड फेकून मारला.
- दगड लागल्याने साप तिथून निघून गेला. त्यानंतर मुलेही आपापल्या घरी आली. दोन्ही मुलांनी सापाचा किस्सा कुटुंबीयांना सांगितला.
जमीनीवर झोपले होते सर्वजण
- सचिन आणि बलराम हे चार भाऊ-बहिण आहे. या दोघांपेक्षा एक बहिण मोठी आहे तर तिच्या पेक्षा एक मोठा भाऊ (19 वर्षे) आहे.
- सर्व भावंडे रात्री जमीनीवर झोपले होते. त्यांच्यासोबत त्यांची एक चुलत बहिणही होती. दोघी बहिणी दोन बाजूला आणि दोन्ही मुले (सचिन आणि बलराम) त्यांच्यामधे झोपले होते.
- रविवारी रात्री 11 वाजता सचिनच्या हातावरुन काहीतरी गेल्यासारखे झाले आणि त्याची झोपमोड झाली.
- तो मोठ्याने किंचाळला त्यामुळे चौघे भावंडे जागी झाले. त्याच्या भावाला काही समजण्याच्या आत सापाने त्याच्या पायाला दंश केला.
- मुलांच्या रुममध्ये आरडाओरड ऐकू आल्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. मुलांच्या रुमच्या दिशेने धावले.
- त्यांनी पाहिले की रुममध्ये सहा फूट लांब एक नाग वेटोळा करुन बसला होता.
- सर्वांचा एकच गोंधळ उडाला, आरडाओरड सुरु झाली. त्यांच्या आवाजाने शेजारी तिथे पोहोचले.
- लोक लाठ्या-काठ्या घेऊन आले आणि सापाला मारु लागले. कुटुंबीयांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर साप छतापर्यंत उंच उडी घेत होता.
- अखेर लोकांनी सापाला काठ्या मारून चिरडले.
मुलांना जादूटोणा करणाऱ्या बाबाकडे नेले, सकाळपर्यंत गेला जीव
- मुलांना साप चावल्यानंतर लोकांनी त्यांना गावातीलच जादूटोणा करणाऱ्या एका बाबाकडे नेले. तो विष उतरवतो असे बोलले जाते.
- जादूटोणा करणाऱ्या बाबाचे तोटके काही कामी आले नाही. मुलांची प्रकृती मिनिटा-मिनिटाल बिघडत चालली होती.
- सकाळ होतांना दोन्ही मुले निपचीत पडली. सोमवारी सकाळी गावकऱ्यांनी दोघांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले तिथे डॉक्टारांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
- तोपर्यंत पोलिससही तिथे पोहोचले. पोलिसांनी मुलांचे मृतेदह पोस्टमॉर्टम करुन कुटुंबीयांच्या हवाली केले.
सर्व फोटो- आदर्श मधुकर
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अजगरासोबतचा सेल्फी कसा ठरला खतरनाक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...