आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेलाही फटका बसला आहे. कळवा आणि मुंब्रा येथे रुळांवर पाणी साचल्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतुक गेल्या दोन तासांपासून ठप्प आहे. सर्व उपनगरीय गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईकडे येणाऱ्या व उपनगराकडे जाणाऱ्या गाड्या सुमारे अर्धा तास उशीराने धावत आहेत. कळव्याजवळ सकाळी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तो दुरस्त झाल्यानंतर पावसामुळे वाहतूक ठप्प पडली. मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान ठिकठिकाणी रुळांवर पाणी आले.
रायपूर- मुंबईत पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर नागपूरजवळ हावडा-मुंबई मेलचे 1 डबे रुळावरुन घसरल्यामुळे मुंबईकडे येणा-या गाड्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. हावडा-मुंबई मेलचे वातानुकुलीत श्रेणीचे दोन डबे घसरले. ही घटना सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास पाणियाजोब आणि बोर्तालाव स्थानकांदरम्यान घडली. हे स्थान महाराट्र आणि छत्तीसगढच्या सीमेजवळ आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे आपात्कालीन पथक घटनास्थळी रवाना झाले.
या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. परंतु, अपघातामुळे मुंबईकडे जाणारी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रायपूर येथे तर पुण्याला जाणारी आझाद हिंद एक्स्प्रेस दुर्ग स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. रुळांवरील डबे बाजुला केल्यानंतर सुमारे 2 तासांनी या गाड्या सोडण्यात आल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.