आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नन अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रानाघाट कॉन्व्हेंटच्या ७१ वर्षीय ननवरील अत्याचार प्रकरणातील अन्य दोन प्रमुख आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली.
सीआयडीने ही कारवाई केली. दोन्ही आरोपी बांगलादेशचे नागरिक आहेत. त्यांना सियालदह रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. यापैकी एक टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. गुंडांनी १४ मार्च रोजी शाळेवर हल्ला केला होता. त्यांनी शाळेतून १२ लाख रुपयांची लूट केली होती.
बातम्या आणखी आहेत...