आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात दोन दलित मुलांना जिवंत जाळले, आईवडील होरपळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जितेंद्र
फरिदाबाद/ नवी दिल्ली - राजधानी दिल्लीला लागूनच असलेल्या एका खेड्यात झोपेत असलेल्या दलित कुटुंबातील दोन चिमुरड्यांना पूर्ववैमनस्यातून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर गंभीर भाजलेले त्यांचे आई-वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. दिल्लीजवळच्या सोनपेठ गावात सोमवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. हे गाव हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात येते. हे दलित कुटुंब गाढ झोपेत असताना त्यांच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. या आगीत अडीच वर्षांचा वैभव, त्याची ११ महिन्यांची बहीण दिव्या होरपळून जागीच ठार झाले. त्यांची आई रेखा ७० टक्के भाजली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.