आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two Day Child Auctioned By Doctor In Muzaffarnagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन दिवसांच्या बाळाची डॉक्टरने लावली बोली, 50 हजारात झाली विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - येथे एका डॉक्टरने दोन दिवसांच्या बाळाचा लिलाव केला. विशेष म्हणजे त्याला प्रतिसाद मिळाला आणि 50 हजारात बाळाची विक्री करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार ज्याला बाळ कमी किंमतीत खरेदी करता आले नाही त्याने उघड केले आहे.
मुझफ्फरनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरवर आरोप आहे की त्याने दोन दिवसांच्या बाळाची बोली लावली. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे, तर बाळाला हॉस्पिटलमध्ये पोलिस संरक्षणात ठेवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?
डॉ. जितेंद्र चौधरीच्या हॉस्पिटलमध्ये मंगळवारी एका महिलेने बाळाला जन्म दिला. सांगितले जात आहे की महिला अविवाहीत होती. डॉक्टर चौधरी तिला म्हणाला, बापाचे नाव नसलेल्या मुलाला घेऊन राहिली तर समाजात त्याला काही स्थान राहाणार नाही. तिझ्यावरही लोक नको ते आरोप करतील. लोकनिंदेचा रोज सामना करावा लागेल, असे सांगून त्याने बाळाच्या निलामीसाठी तिचा होकार मिळवला. त्यानंतर हॉस्पिटलचा मालक डॉ. जितेंद्र चौधरीने अनेक लोकांना फोन करुन बोलावून घेतले. बाळाला खरेदी करण्यासाठी अनेक लोक हजर झाले. कलीम अहमद नावाच्या व्यक्तीने 20 हजारांची बोली लावली. एका श्रीमंत दाम्पत्याने सर्वाधिक 50 हजारांची बोली लावली आणि बाळ खरेदी केले. त्यानंतर कलीमने या सर्व प्रकार पोलिसांना जाऊन सांगितला. डॉ. चौधरीला अटक करण्यात आले आहे. कलमीने आरोप केला की चौधरीकडे बनावट डीग्री आहे त्याच आधारे त्याची प्रॅक्टीस सुरु आहे.
बाळाच्या भविष्याचा निर्णय कोर्ट घेणार
दोन दिवसांच्या बाळाचा लिलाव होण्याच्या या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अरुणकुमार सिंह करत आहेत. त्यांनी सांगितले, कलीमच्या तक्रारीनूसार डॉक्टर चौधरीला अटक करण्यात आली आहे. ज्या दाम्पत्याने बाळाला खरेदी केले होते त्यांच्याकडून त्याला परत घेण्यात आले असून पोलिस संरक्षणात हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. आरोपी डॉक्टरकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि संबंधीत लायसन्स आहेत का याचा तपास सुरु आहे. बाळाचा ताबा कोणाकडे द्यायचा याचा निर्णय आता कोर्ट करेल. पोलिसांचे म्हणणे आहे की बाळाला स्विकारण्यास त्याच्या आईने नकार दिला आहे.