आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी मुलगीच झाल्‍याने 2 दिवसाच्‍या बाळाला बादलीत बुडवून केले ठार, जवानाचे कृत्‍य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तारानगर (चुरू)- राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील घासला अगुणा येथे गुरुवारी एका निर्दयी जवानाने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीला आईच्या कुशीतून ओढून नेले. त्यानंतर तिला बादलीत बुडवून ठार मारले व या मुलीचा मृतदेह गुपचूप पुरूनही टाकला. त्यानंतर त्या मातेने माहेरी ही घटना कळवली. जवानाच्या विरोधात नवजाताची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सहायक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नवजात मुलीचा मृतदेह स्मशानातून उकरून बाहेर काढला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी जवानास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सिकर जिल्ह्यातील घासला अगुणा गावातील जवान अशोक जाट याची पत्नी प्रियांकाने १४ नोव्हेंबर रोजी सादूलपूर येथे खासगी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला.  प्रसूतीनंतर अशोकने तिला गावी नेले. मोठी मुलगी राव्या १४ महिन्यांची असून तिला आजोळी नेऊन सोडले. लष्करात शिपाई असलेल्या अशोकने गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता पत्नी प्रियांकाला म्हटले, दुसरी मुलगीच झाली. रागाच्या भरात  त्याने प्रियांकाच्या कुशीतून त्या बाळास ओढून घेतले. घरासमोर असलेल्या पाण्याने भरलेल्या बादलीत तिला बुडवून ठार मारले.  

 

दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्याने चिंतेत होता पती  

प्रियांकाने सांगितले, दुसरी मुलगीच झाल्याने अशोकला आनंद झाला नव्हता. पतीने तिच्याकडे दहा लाखांची मागणी केली. दोन-दोन मुलीच झाल्या आहेत. त्यांच्या पालनपोषणासाठी इतकी रक्कम लागेल. आधीच कर्ज काढलेले आहे. तेव्हा काही दिवसांनंतर माहेराहून पैसे आणून देण्याचे आश्वासन प्रियांकाने त्याला दिले होते. 

 

 

चार फूट खाली पुरलेल्या बाळाचा मृतदेह काढताच आईचा बांध फुटला  

शुक्रवारी एसडीएम इंद्राजसिंह, तहसीलदार राजेंद्रसिंह, एसएचओ रामचंद्र करवा घटनास्थळी दाखल झाले. स्मशानात पुरलेल्या बाळाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्या वेळी प्रियांका पालकांसोबत स्मशानात हजर होती. कपड्यात गुंडाळलेला मृतदेह पाहताच प्रियांकाचा बांध फुटला. तिची आईही रडत होती.

 

पत्नीने दाखल केली हत्येची तक्रार  
घटनेनंतर गुरुवारी रात्री प्रियांकाने पती व सासऱ्याच्या  विरोधात नवजात मुलीची हत्या केल्याच्या व तिला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.  प्रियांका सुभाषचंद्र जाट (रा. जयपुरिया खालसा, राजगड) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी घासला अगुणा येथील अशोक ज्याणी याच्याशी झाला होता. अशोक लष्करात नोकरी करतो. गुरुवारी पतीने नवजात मुलीला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारले होते.  


वैद्यकीय बोर्ड करणार शवविच्छेदन  
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवजात मुलीच्या आजोळच्यांनी तिचा मृतदेह चुरूच्या राजकीय डीबी रुग्णालयात आणला. येथील वैद्यकीय बोर्डाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी शवविच्छेदन केले. रुग्णालयाचे अधीक्षक डा. जे. एन. खत्री यांनी सांगितले, पथकात ज्युरिस्ट डॉ. सुनील शर्मा व गोविंद बबरेवाल यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...