आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुगाडातून जीवदान, जमशेदपूरच्या ‘थ्री इडियट‌्स’नी वाचवले नवजात चिमुड्याचे प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर - दोन डॉक्टरांनी ‘थ्री इडियट्स’मध्ये दाखवलेला जुगाड करून एक तासाच्या नवजाताला वाचवले. मुलाचा बुधवारी जन्म झाला, पण तासाभरानंतर श्वासोच्छ्वास थांबला होता. मुलाने गर्भातील पाणी (मॅकोनियम) प्याले होते. ते श्वासनलिकेतून फुप्फुसात गेल्याने श्वास बंद झाला होता. वैद्यकीय परिभाषेत त्याला ‘सिव्हेरियन बर्थ’ म्हणतात. अशा स्थितीत उपचारासाठी सी-पॅप नामक यंत्र आवश्यक असते. पण रुग्णालयात चार लाख रुपयांचे हे यंत्र नव्हते. डॉक्टरांनी मुलाला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मुलाची आई अंबिका आणि वडील सिदाम राय यांनी सांगितले की, एवढी रक्कम आमच्याकडे नाही. मग डॉ. मनीष भारती आणि डॉ. रविकांत भगवान या दोन कनिष्ठ डॉक्टरांना युक्ती सुचली. त्यांनी रुग्णालयातील ९० रुपये किमतीच्या वस्तूंद्वारेच सी-पॅप सारखे यंत्र बनवले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचे प्राण वाचले. ही घटना जमशेदपूरच्या महात्मा गांधी स्मृती रुग्णालयातील आहे. अंबिका आणि सिदाम यांच्यासाठी दोन्ही डॉक्टर देव आणि रुग्णालयासाठी हीरो ठरले.

९० रुपयांत असा जमवला जुगाड
डॉ. रविकांत म्हणाले, आम्ही ६० रुपयांची पीडिया ट्रिप आणि ३० रुपयांची थ्री-वे कॅनुला अशा दोन वस्तू घेतल्या. त्या ऑक्सिजन सििलंडरला जोडल्या. कॅनुलाच्या एका भागातून ऑक्सिजन दिला आणि दुसऱ्यातून ड्रिपशी जोडले. तिसरा भाग मुलाच्या नाकाला जोडून ऑक्सिजन दिला. मुलाने श्वास घेतला आणि हवा सोडली. त्याबरोबर वायू वेगवेगळे झाले आणि ड्रिपमधील पाण्याच्या प्रेशरने एअरवे खुला झाला. सी-पॅपद्वारे हेच केले जाते.
आम्ही घाबरलो होतो. दोन्ही डॉक्टरांच्या समयसूचकतेमुळे मुलाला वाचवण्यात आले. आता तो धोक्याबाहेर आहे.
- डॉ. अजय कुमार, बालरोगतज्ज्ञ, एमजीएम रुग्णालय.
बातम्या आणखी आहेत...