आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 प्रियकरांकडून मित्राचा गळा चिरून फोनवर किंचाळ्या ऐकल्या, भावालाही ठार मारणार होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमिका आणि पीडित हनी... - Divya Marathi
प्रेमिका आणि पीडित हनी...
अमृतसर - येथील एका गावात 14 वर्षीय तरुणीसह तिच्या 2 प्रियकरांना हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी मुलीने आपल्या प्रियकरांकडून हनीचा गळा चिरून खून केला. तसेच फोनवर त्याच्या किंचाळ्या सुद्धा ऐकल्या. यानंतर प्रियकरांच्याच मदतीने ती आपल्या भावाचीही हत्या करणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी तिघांना अटक केली.
 
 
आरोपींच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणीने दोन मुलांना लिहलेले प्रेम पत्र आणि फोन रेकॉर्ड पोलिसांना सुपूर्द केले आहेत. या मुलीच्या अटकेसाठी पीडित आई-वडिलांसह आरोपी मुलांच्या पालकांनी सुद्धा मुलीच्या अटकेसाठी पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते. 
 
 
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केला खून
- हनीला ठार मारणाऱ्या गगन आणि अजयच्या आई-वडिलांनी सुद्धा इतर नातेवाईकांच्या सोबतीने पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. 
- आरोपी गगनच्या आई जसबीर आणि बहीण अमनदीपने गगनच्या अटकेनंतर त्याच्या खोलीत जाऊन चाचपणी केली. त्यावेळीच या दोघींना आरोपी मुलीने पाठवलेले प्रेम पत्र सापडले आहेत. 
- गगनदीपच्या घरी सापडलेल्या प्रेम पत्रातूनच हनी खून प्रकरणाच्या तपासाला नवे वळण लागले. 
- आरोपी मुलीने गगन व अजय या दोघांनाही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हनीचा खून करायला भाग पाडले. केवळ हनीच नव्हे, तर ती या दोघांच्या मदतीने आपल्या भावाचा सुद्धा काटा काढणार होती. ऐनवेळी पोलिसांनी दोघांना अटक केली नसती, तर त्यांनी भावाचा देखील खून केला असता.
- गगनदीप आणि अजयच्या नातेवाईकांनी आरोपी मुलीकडून आलेले लव्ह लेटर्स आणि फोन रेकॉर्डिंग पोलिसांच्या हवाली केले आहेत. 
 
 
काय आहे प्रकरण?
- आरोपी मुलीये ऐकूण तिचा बॉयफ्रेंड गगन याने आपला मित्र तेजिंदर अजय याच्या मदतीने हनीच्या खुनाचा षडयंत्र रचला. गेल्या सोमवारी दोघांनी हनीला कालव्याकडे बोलावले. 
- या ठिकाणी गगनने आपल्या गर्लफ्रेंडला फोन लावून तो हनीला दिला. हनी तिला बोलतच होता की अचानक गगनने हनीवर धारदार शस्त्राने मागून प्रहार केला. यात हनीचा कान कापून खाली पडला. यानंतर गगन आणि अजयने एका श्वासातच हनीवर वारंवार प्रहार केले आणि हनीचे शिर त्याच्या शरीरापासून वेगळे केले. तसेच हनीचा मृतदेह त्याच कालव्यात फेकून दिला. 
- पोलिस अधिकारी राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गगन आणि अजय या दोघांना अटक करण्यात आली आहे. गगन 17 वर्षांचा तर तेजिंदर अजय फक्त 16 वर्षांचा आहे. 
- आपल्या गर्लफ्रेन्डला वारंवार फोन करून त्रास देत असल्यानेच हनीचा खून केला असे गगने पोलिस चौकशीत मान्य केले आहे. 
- विशेष म्हणजे, आरोपी प्रेमिकेला हनीच्या किंचाळ्या ऐकवायच्या होत्या. त्यामुळेच त्याला फोन दिला होता अशी कबुली सुद्धा हनीने दिली आहे. 

 
अटकेच्या भितीने रुगणालयात दाखल झाली
- या घटनेतील आरोपी मुलीचे वय फक्त 14 वर्षे आहे. तिनेच हनीला ठार मारणाऱ्या गगन आणि अजय या दोघांनाही प्रेम पत्र लिहले होते. 
- गगन आणि अजयच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी मुलगी दोन्ही प्रियकरांच्या मदतीने भावाला सुद्धा ठार मारणार होती. 
- गगन आणि अजयला अटक झाल्यानंतर आरोपी मुलगी रुगणालयात दाखल झाली होती. अटकेपासून वाचण्यासाठी ती उपचाराचे सोंग करत असल्याचे आरोप हनी आणि आरोपींच्या नातेवाईकांनी केले होते. तसेच तिच्या अटकेसाठी पोलिसांवर सुद्धा दबाव टाकला होता.
बातम्या आणखी आहेत...