आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भररात्री 2 तरुणींची गुंडगिरी; एकाला कमरेखाली मारला चाकू, दम देत कारची काचही फोडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींची गुंडगिरी सीसीटीव्हीत कैद झाली. - Divya Marathi
तरुणींची गुंडगिरी सीसीटीव्हीत कैद झाली.
राजकोट (गुजरात) - रविवारी रात्री उशिरा टू-व्हीलरवर निघालेल्या दोन तरुणींनी चाकूने भोसकून एका जणाला जखमी केले. यात दोन तरुणींसह इतर दोन तरुणही होते. सूत्रांनुसार, एका ठिकाणी मुलांचा ग्रुप थांबलेला होता. तेवढ्यात स्कूटीवरून आलेल्या दोन तरुणींनी सर्वात आधी ग्रुपमधील एका मुलाला कमरेखाली चाकू मारला.
 
घाण-घाण शिव्याही देत होत्या तरुणी...
- जखमी मुलगा आणि तेथे उपस्थित इतरांनी सांगितले की, या मुली घाण-घाण शिव्याही देत होत्या.
- तरुणी आणि त्यांच्या साथीदारांची गुंडागर्दी एवढ्यावरच थांबली नाही.
- या चौघांनी केवडावाडी रोडवर एका कारचा पाठलाग केला आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीला नीट गाडी चालवण्याची ताकीद देऊन कारची काच फोडली.
- सात मिनिटांत या दोन घटना घडल्यानंतर तरुणी त्यांच्या साथीदारांसह फरार झाल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस या गुंड तरुणींचा आणि त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...