पानीपत/बहादुरगढ़ (हरियाणा) - हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील नूना माजरा (ता. बहादूरगड) येथे आज (रविवार) 2 जिंवत हँड ग्रेनेड आणि 100 पेक्षा डेटोनेटर्स सापडले. त्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी येत त्यांना निकामी केले. हे बॉम्ब या ठिकाणी कुणी आणून टाकले, याचा तपास पोलिस करत आहेत. याच आठवड्यात बुधावारी कुरुक्षेत्रक्षच्या शाहाबाद परिसरातून जाणा-या रेल्वे रुळाजवळ सात बॉम्ब आढळले होते. ते सैन्य दलाचे असल्याचा नंतर खुलासा झाला होता.
आज सकाळी नूना माजरा गावातील पाउर हाऊस जवळ काही नागरिकांना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्या. त्यानंतर सर्तकता म्हणून ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत ग्रेनेड्स आणि डेटोनेटर्सची पाहणी केली. नंतर ते निकामी करण्यात आले. या बाबत एएसआआ राकेश यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, असे हातबॉम्ब आणि डेटोनेटर सेनेकडेच असतात. ते सैनेच्या कोणत्या युनिटचे आहेत आणि या ठिकाणी कसे आलेत, याचा तपास पोलिस करत आहेत.
पुढील स्लाड्सवर पाहा संबंधित फोटो