आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरांना फक्त जेवण देऊन बांधून घेतली ही हवेली, जयपूरच्या हवामहलला देते टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुरु येथील सुराणा हवेली - Divya Marathi
चुरु येथील सुराणा हवेली
जयपूर (राजस्थान) - मराठीमध्ये एक गाणं आहे 'सातशे खिडक्या नऊशे दारं...' एखाद्या महालाला एवढ्या खिडक्या आणि दरवाजे असतील अशी आपण फक्त कल्पनाच केलेली आहे. पण कवीची ही कल्पना राजस्थानमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खरी असल्याची खात्री पटते. होय... राजस्थानमध्ये 700 खिडक्या असलेली एक हवेली आहे. या हवेलीची ही दारं-खिडक्या बंद करण्यासाठी एका व्यक्तीला एक दिवस लागतो.

राजस्थानमधील 'हवामहल' जगप्रसिद्ध आहे. तो पाहाण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. पण येथे एक नाही तर दोन हवामहल आहेत. एक जयपूरमध्ये तर दुसरा आहे चुरु येथे. चुरु येथील महल 'सुराणा हवेली' नावाने ओळखला जातो. जयपूर येथील हवामहलला टक्कर देण्यासाठीच सुराणा हवेली बांधण्यात आली का, असा प्रश्न या हवेलीला पाहिल्यानंतर निर्माण होतो. कारण हवामहलपेक्षा येथे दुपटीने खिडक्या जास्त आहेत. हवामहलमधील खिडक्यांच्या संख्येमुळेच तो प्रसिद्ध आहे. मात्र, हवामहलपेक्षा सुराणा हवेलीतील खिडक्या आणि दरवाजांची संख्या जास्त आहे. एवढेच नाही तर हवामहलपेक्षा एक मजला देखील सुराणा हवेलीत जास्त आहे. त्यामुळे सुराणा हवेली हवामहलला मागे टाकते.
हवामहल आधी बांधण्यात आला आहे तर, सुराणा हवेली त्यानंतर बांधण्यात आली. या हवेलीला 700 खिडक्या आहे, तर हवामहलमध्ये 365 खिडक्या आहेत. या हवेलीचे निर्माण 1870 मध्ये झाले तर, हवामहल त्याआधी तयार झाले होते. त्यामुळे हवामहलला आव्हान देण्यासाठीच ही हवेली बांधण्यात आली असे बोलले जाते. या हवेलीच्या भिंतींवर चित्र काढण्यात आली आहेत. ती त्या काळाचा इतिहास सांगणारी आहेत. जयपूरचा हवामहल पाच मजली आहे, तर चुरू येथील सुराणा हवेली सहा मजली आहे.
खिडक्या - दरवाजे बंद करण्यासाठी लागतो पूर्ण दिवस
हवेलीची देखभाल करणारे सांगतात की, येथील खिडक्या आणि दरवाजे बंद करण्याचे काम सकाळी सुरु केले तर ते संध्याकाळी संपते. येथे 111 दरवाजे आहेत. त्यामुळे त्यातील काही कायम बंदच ठेवले जातात.
मजुरांना फक्त जेवण देऊन बांधून घेतली हवेली
सुराणा हवेली नावाने प्रसिद्ध या हवेलीच्या बांधकामात फार द्रव्य खर्च झाले नाही. असे म्हटले जाते, की सुराणाने यासाठी मजुरांना फक्त दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. हवेलीचे बांधकाम केले गेले तेव्हा राजस्थानमध्ये दुष्काळ पडला होता. लोक अन्नासाठी काहीही करायला तयार होते. तेव्हा मजुर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करुन हवेली बांधून घेण्यात आली होती.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, हवेलीची सध्याची स्थिती