आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Jawans Injured As Militants Attack An Army Camp In Samba

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; लेफ्टनंट कर्नल शहीद, लष्कराने उडवली इमारत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मिरमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांशी सुरु असलेली चकमक संपली आहे. लष्कराने छावणीतील एक इमारत उडवून दिली आहे. तीन दहशतवादी मारले गेल्याचीही माहिती आहे. सकाळी 6.45 वाजता केलेल्या दुहेरी हल्ल्यात आतापर्यंत 12 जणांचा जीव गेला आहे. यात एक लेफ्टनंट कर्नल विक्रमजीत सिंह, दोन लष्कराचे जवान, सहा पोलिस कर्मचारी आणि तीन नागरिक आहेत.

सांबा येथे लष्कराच्या मदतीसाठी अतिरिक्त कुमक आणि चेतक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्लांनी सांगितले की, हल्लेखोर दहशतवादी 12 ते 24 तासांआधी भारतीय हद्दीत घुसले होते. या आधारावर गुप्तचरसंस्थेच्या अधिका-यांनी जम्मू-काश्मिरच्या इतर भागातही हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात तिहेरी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(दिग्विजयसिंह म्हणाले, पाकिस्तान दहशतवादाने पछाडलेला देश)

हल्लेखारांच्या तपासासाठी गेलेल्या गस्ती पथकांनी केरन नियंत्रण रेषेवरून दुपारपर्यंत 30 संशयीतांना ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या दुहेरी हल्ल्याची जबाबदारी शोहादा ब्रिगेड या अपरिचीत संघटनेने घेतली आहे.

शांतता चर्चेला बाधा येणार नाही - पंतप्रधान
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हल्ल्याचा निषेध केला असून असे हल्ले शांतता चर्चेत बाधा निर्माण करु शकणार नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी हल्लेखोरांचा शोध घेतला जाईल असे सांगितले आहे. पंतप्रधान डॉ. सिंग संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. यावेळी तेन्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करणार आहेत. याबरोबर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आदी देशांतील नेत्यांशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

(जम्मू-काश्मिरमधील दुहेरी हल्ल्यानंतर पाकशी चर्चेवर भाजपचा आक्षेप )

सकाळी 6.45 वाजता हिरानगर पोलिस स्टेशनवर हल्ला
चार ते पाच दहशतवादी लष्कराच्या वेशात छावणीत घुसले. त्याआधी दहशतवाद्यांनी सकाळी 6.45 वाजता दरम्यान हिरानगर पोलिस स्टेशनला लक्ष्य केले. या हल्ल्यात चार जण मारले गेले. त्यानंतर ट्रकमध्ये बसून ते फरार झाले. थोड्याच वेळात दहशतवाद्यांनी सांबा येथील लष्करी छावणीवर हल्ला केला. येथे लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादी आणि जवानांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

सांबा लष्करी तळावर हल्ला
हिरानगर पोलिस स्टेशनवर हल्ला केल्यानंतर पोलिस कर्मचा-यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांबा येथील लष्कराच्या जवानांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तर ते लष्कराच्या छावणीत घुसले आणि गोळीबार सुरु केला.

दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू - पठाणकोट हायवे सील करण्यात आला आहे. जम्मूपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेले हिरानगर पोलिस स्टेशन जम्मू - पठाणकोट हायवेवर आहे.

'शोहादा ब्रिगेड'ने स्विकारली जबाबदारी
शोहादा ब्रिगेड या अपरिचित दहशतवादी संघटनेने कठुआ आणि सांबा येथील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. स्वतःला शोहादा ब्रिगेडचा प्रवक्ता सांगणा-या सामी-उल-हकने पीटीआय वृत्तसंस्थेला फोन करुन हा दावा केला आहे. त्याने तीन हल्लेखोर असल्याचे सांगितले असून ते जम्मू-काश्मिरचे नागरिक असल्याचा दावा केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, जम्मु काश्मिरच्या पोलिस महानिरीक्षकांनी सांगितला घटनाक्रम