आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी ध्वजास उच्च न्यायालयाची मनाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - राज्याच्या वेगळ्या ध्वजाला सरकारी इमारती, वाहनांवर फडकावणे अनिवार्य सांगणाऱ्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या आदेशावर शुक्रवारी हायकोर्टाच्याच दोनसदस्यीय पीठाने मनाई केली.

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने पहिला आदेश दिला होता. कलम ३७० अन्वये राज्याला विशेष दर्जा असल्यामुळे सरकारी इमारती किंवा सरकारी वाहनांवर राज्याचा ध्वज फडकावण्याचे निर्देश दिले होते. भाजपचे प्रवक्ते तथा वकील सुनील सेठी यांनी एकसदस्यीय पीठाच्या आदेशाला दोनसदस्यीय पीठासमोर आव्हान दिले होते. आता पहिल्या आदेशाला तूर्त तरी स्थगिती देण्यात मिळाली आहे. कोणताही ध्वज तिरंग्यासोबत फडकवला जाऊ शकत नाही, असे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी मंगळवारी म्हटले होते.