आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Killed, 16 Injured In Blast At Chemical Factory News In Divya Marathi

केमिकल फॅक्टरीत स्फोट; दोघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमस्थित एका केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी घडलेल्या या घटनेत 26 जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन फाइन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या रिअँक्टरमध्ये स्फोट झाल्यामुळे फॅक्टरीत आग पसरली. बर्‍याच प्रयत्नांनतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण माहीत होऊ शकले नाही. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृतकांमध्ये रामू आणि अलामुरू यांचा समावेश आहे.