आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख लोकांना 500 कोटी रुपयांना फसवले; शाहरुख ,नवाजुद्दीन कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडा येथे ३७०० कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर सोशल ट्रेडच्या नावाखाली फसवणूक करण्याचे आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले. सेक्टर २ येथील वेबवर्क लिंक प्रा. लि. नावाच्या कंपनीने चार महिन्यांत तब्बल दोन लाख लोकांना ५०० कोटी रुपयांना फसवले. गाझियाबाद येथील रहिवासी अमित किशोर जैन यांनी फसवणूक झाल्याची तक्रार सेक्टर - २० येथे तक्रार दिली.  

पोलिस अधीक्षक दिनेश यादव यांनी सांगितले, कंपनीचे संचालक अनुराग गर्ग व सुदेश गर्ग यांच्याविरोधात फसवणूक व आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. सोमवारी कंपनीच्या बाहेर लोकांची गर्दी उसळली होती. कंपनीच्या गेटला कुलूप होते. तर बँकिंग प्रणालीत बदल होत असल्याने कंपनी २ महिन्यांसाठी बंद राहणार असल्याची सूचना लावली होती. तसेच सर्व भागधारकांचे लायसन्स सुरक्षित आहेत, असे म्हटले आहे. कंपनी सप्टेंबर २०१६ पासून चालू होती. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑनलाइन व्यवसाय करून पैसे कमावण्याची लालूच दाखवून लोकांची फसवणूक केली. कंपनीने शाहरुख खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. कार्यालयाबाहेर अभिनेत्यांचे मोठे पोस्टर्स लागले आहेत. या कंपनीचे अॅड्सबुक नावाने अाणखी एक पोर्टल आहे,असा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...