आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयटीच्या दोघांना ६७ लाखांचे पॅकेज, अमेरिकेच्या 'इपिक'ची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर- प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांना अमेरिकी कंपन्यांनी एक लाख डॉलरपेक्षा जास्त वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. इपिक सिस्टिम्स कॉर्पोरेशन कंपनीने आपल्या भरती प्रक्रियेत क्षितिज गुप्ता आणि अली जहीर या बीटेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी साधारण १,०५,००० डॉलर्स (सुमारे ६७ लाख रुपये) पॅकेज दिल्याची माहिती एनआयटीचे प्रो. डाॅ. राजीव भूषण यांनी दिली.
एनआयटी जमशेदपूरच्या इतिहासात विद्यार्थ्यांना मिळालेले हे सर्वाधिक पॅकेज आहे. इपिक सिस्टिम्स कॉर्पोरेशन अमेरिकेच्या व्हिस्कॉसिनमधील हेल्थकेअर सॉफ्टवेअर कंपनी आहे. यानंतर जपानच्या वर्क्स अॅप्लिकेशन्स कंपनीने शुभम सतीश बलदवा आणि भारतसिंग भंडारी यांना ३२ लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे.

२०१३-१४ या वर्षात वर्क्स अॅप्लिकेशन्सने एनआयटीच्या दोन विद्यार्थ्यांना ५०,००,००० येन पॅकेज दिले होते. या वर्षात आतापर्यंत झालेल्या मुलाखतीत ६०० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. मुलाखती जूनपर्यंत होणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...