आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी मुलांनी केले भाकरीच्या शोधात सीमोल्लंघन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - भारतीय लष्कराने रविवारी दोन पाकिस्तानी मुलांना सीमेपलीकडे सुखरूप पाठवले. 22 मार्च रोजी ही मुले सीमा ओलांडून भारतात आली होती. त्यांनी आपण पाकिस्तानच्या कोटली परिसरातील रहिवासी आहेत. गरिबीला कंटाळून त्यांनी सीमा ओलांडण्याचा धोका पत्करल्याचे त्यांनी सांगितले. ही दोन्ही मुले 22 मार्चच्या रात्री नौशेरा परिसरात आढळली होती. त्यांची नावे रहमतुल्लाह (वय 15 वर्षे) आणि इनायततुल्लाह (वय 12 वर्षे) अशी आहेत. चौकशीनंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना परत पाठवण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला. शनिवारी हॉटलाइनवर पाकिस्तानी लष्कराला चकनदाबाग येथे बैठकीसाठी संदेश देण्यात आला आणि रविवारी या दोघांनाही पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या हवाली करण्यात आले. त्यावेळी मुलांना कपडे, मिठाई आणि खेळणीही देण्यात आली. भारतीय लष्कराने जेवढ्या भेटवस्तू दिल्या तेवढ्या आम्ही आजपर्यंत कधीच पाहिल्या नाहीत, असे या दोन मुलांनी सांगितले.