आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Persons Arrested With Cut Fingers Having Expensive Rings On

उत्तराखंडः प्रेशर कुकरमध्‍ये आढळली मृतदेहांची अंगठ्यांसह कापलेली बोटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तराखंडमध्‍ये राजकीय पक्षांमध्‍ये राजकीय युद्ध रंगले आहे. तर दुसरीकडे काही समाजकंटकांकडून पूरग्रस्‍तांवर होणारे अत्‍याचार आणि पिळवणूक वाढत आहे. सरकार याबाबत गंभीर झालेले दिसत नाही. उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री विजय बहुगुणा यांनी बलात्‍कार आणि लुटीची कोणतीही तक्रार प्रशासनाकडे प्राप्‍त झालेली नाही, असे म्‍हटले आहे.

प्रलयानंतर बचावलेल्‍या अनेकांनी पूरग्रस्‍त महिलांवर बलात्‍कार आणि लुटमारीच्‍या घटना घडल्‍याचे सांगितले होते. मात्र, मुख्‍यमंत्री वेगळाच दावा करत आहेत. वास्‍तव वेगळेच आहे. बचाव कार्यातील जवानांनी दोन जणांना अटक करुन हजारो रुपये आणि सोन्‍याचे दागिने जप्‍त केले आहेत. केदारनाथ आणि गौरीकुंड येथील पूरग्रस्‍त भागात वैद्यकीय सुविधा देण्‍यासाठी शिबिरे लावण्‍यात आली आहेत. त्‍यापैकी एका शिबिरात दोन जण उपचारांसाठी गेले होते. त्‍यांच्‍याकडे प्रेशर कुकर होते. ते पाहून वैद्यकीय पथकातील एक डॉक्‍टर प्रदीप भारद्वाज यांना संशय आला. त्‍यांनी सैन्‍याच्‍या जवानांना याबाबत माहिती दिली. जवानांनी प्रेशर कुकर उघडल्‍यानंतर धक्‍काच बसला. त्‍यात अनेक मृतदेहांची कापलेली बोटे होती. बोटांवर महागड्या अंगठ्या होत्‍या.

जवानांनी दोघांना अटक केल्‍यानंतर हे वास्‍तव अधिकृतरित्‍या समोर आले आहे. तरीही मुख्‍यमंत्री अशा घटना घडल्‍याचे मान्‍य करायला तयार नाहीत.