आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरनाथ यात्रा : दगड कोसळल्याने दुर्घटना, दोन भाविकांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमरनाथ यात्रेदरम्यान दगड कोसळल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतामध्ये वाराणसीचे सुरेश यादव आणि भटिंडाचे तारा सिंह यांचा समावेश असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत तीन यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. एका दिवसापूर्वीच एका भावीकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

तिसरा जत्था रवाना
अमरनाथ यात्रेकरूंचा तिसरा जत्थाही रविवारी जम्मूच्या बेस कॅम्पवरून रवाना झाला आहे. यात्रेकरूंची सुरक्षाव्यवस्था पाहणा-या पोलिसांच्या मते या जत्त्थ्यामध्ये एकूण 1,458 भावीकांचा समावेश आहे. त्यात 1,097 पुरुष, 203 महिला, 13 मुले आणि 145 साधू आहेत.

यात्रेचा समारोप 10 ऑगस्टला
सुमारे 44 दिवसांची ही यात्रा अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेमध्ये होत आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेची सुरुवात केवळ काश्मिर-बालटाल मार्गावर झाली आहे. त्याचे कारण म्हणजे पहलगाम मार्गावर पडणारा बर्फ हे आहे. दरवर्षी सुमारे दोन लाख भावीक अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करतात. तर यात्रेचा समारोप 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.
फोटो : अमरनाथ यात्रेदरम्यान पुढचा प्रवास करताना एक भावीक