आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षली हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी शहीद; रांचीपासून सुमारे 150 किमी अंतरावर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बानो (सिमडेगा)- झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या सिमडेगा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या हल्ल्यात बानोचे ठाणेप्रमुख विद्यापतीसिंह आणि तुराम बिरुली हे दाेघे शहीद झाले. पोलिसांनी सीआरपीएफ आणि नक्षलविरोधी मोहिमेत वापरात येणारी जॅग्वार तुकडी सोबत न घेतल्याने नक्षलवाद्यांचा धोका फारसा गांभीर्याने घेतलेला नाही, असे या घटनेवरून निदर्शनास येते.

पीपल्स लिबरेशन फ्रंट या नक्षलवादी संघटनेशी झालेल्या चकमकीत पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी बारुद गोप या नक्षलवाद्यास अटक केल्यानंतर बानोचे ठाणेप्रमुख विद्यापतीसिंह यांना रायका गावात आठ नक्षलवादी शनिवारी रात्री थांबणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी या नक्षलवाद्यांना घेरले व शरण येण्यास सांगितले.

पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात त्यांनी माहिती कळवली. त्यानंतर पोलिस दल घेऊन ते गावात गेले. रात्री ८.४० च्या सुमारास बालेश्वर महतो याच्या घराबाहेर थांबून त्यांनी नक्षलवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले.  रात्री ९ वाजता ७ नक्षलवादी घराबाहेर आले. ते पाहून ठाणेप्रमुख आणि शिपाई दगडाच्या अाडून समोर आले. तेवढ्यात पाठीमागे लपलेल्या ८ व्या नक्षलवाद्याने एके -४७ मधून गोळीबार सुरू केला. अर्धा तास गोळीबार सुरू होता. डोक्यात गोळी लागल्याने ठाणेप्रमुख विद्यापती सिंह ( ३६) व शिपाई तुराम (३० ) जागेवरच कोसळले. एक गोळी दुसरा  शिपाई लौरिक सिंह यांच्या डोक्याजवळून गेली.  गोळीबार सुरू असल्याने एक तासभर मृतदेह उचलता आले नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...