आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्रास IITमध्ये एकाच दिवशी दोन महिलांची आत्महत्या, एक रिसर्च स्कॉलर दुसरी प्राध्यापकाची पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - मद्रास आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये बुधवारी दोन महिलांनी आत्महत्या केली आहे. यातील एक रिसर्च स्कॉलर होती. पोस्ट डॉक्टरल स्कॉलर पी. महेश्वरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती 34 वर्षांची होती. तर दुसरी महिला 47 वर्षांची असून ती येथली एका प्राध्यापकाची पत्नी होती.
पोलिस काय म्हणाले
- पोलिसांच्या माहितीनुसार, स्कॉलर महेश्वर येथील केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये संशोधन करीत होती.
- येथील साबरमती होस्टेलमध्ये ती राहात होती. बुधवारी दुपारी 4 वाजता तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती विवाहित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
- एकाच दिवशी मद्रास आयआयटीमध्ये दोन आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
- आत्महत्या करणारी दुसरी महिला एका प्राध्यापकाची पत्नी होती. तिचे नाव जी. विजयालक्ष्मी होते.
- विजयालक्ष्मीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
बातम्या आणखी आहेत...