श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लष्कर आणि पोलिसांनी बडगाव चेक पोस्टवर एका खासगी वाहनाला रोखले. परंतु वाहनात दबून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवान आणि पोलिसांनी गोळीबार करून त्यांना प्रत्युत्तर दिले असता दहशतवादी कार सोडून पसार झाले. लष्कराचे जवान आणि पोलिसांनी 'सर्च ऑपरेशन' सुरु केले आहे.
बडगावसह पुलवामामध्ये पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्विकारली नाही.