आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: हंदवाड्यात दोन दहशतवाद्यांचा एन्काउंटर, बॉर्डरवर दिसला हाफिज सईद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील हंदवाड्यात शुक्रवारी सकाळी लष्कर व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चककमीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र, या चकमकीत दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दहशतवादी संघटना जमात-उद-दावा म्होरक्या हाफिज सईद हा सीमेवर दिसला होता. काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा त्याचा इरादा असल्याचे गुप्तचर संस्थेने माहिती दिली आहे.

हंदवाडा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती गुरुवारी रात्री लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. टीम दहशतवाद्याच्या ठिकाण्यापर्यंत पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, सीमेवर शांतीसाठी उपाययोजना करण्यासाठी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पाकिस्तानी रेंजर्सच्या महासंचालक स्तरावर गुरुवारी सविस्तर चर्चा झाली. सीमवर शांतता प्रस्थापित करण्यासंबंधीच्या चर्चेत सीमेवर होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाचा मुद्दाही चांगलाच गाजला.

दोन सप्टेंबरला बारामूल्लामध्ये एन्काउंटरदरम्यान एक जवान शहीद झाला होता. राफियाबाद भागात हे एन्काउंटर झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी हंदवाड्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, वाघा बॉर्डरवर दिसला हाफिज सईद...