आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर आठवड्यात एेकवतात 10 हजार बालकांना आपल्या आवाजातील दोन गाेष्टी; बंगळुरूच्या ‘गोष्टीवाल्या आजीची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- कालौघात आजीबाईंच्या गोष्टी अस्तंगत होत चालल्या आहेत. दरम्यान, बंगळुरूच्या सरला मिनी व्हाॅट्सअॅप आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून आजींच्या प्रेमाला पारख्या झालेल्या मुलांना गोष्टी एेकवत आहेत. सेवानिवृत्त शिक्षिका असलेल्या सरला यांना आता मुले ‘गोष्टीवाल्या आज्जीबाई’ म्हण्ून ओळखतात. सरला दर आठवड्यात शुक्रवार व शनिवारी आपल्या अावाजात गोष्टी रेकॉर्ड करून मुलांना पाठवतात. एक व्हाइस क्लिप ८ ते १० मिनिटांची असते. ती इंग्रजी व हिंदीत असते. चार महिन्यांपूर्वी सरलांनी हा उपक्रम सुरू केला होता. देश-विदेशात त्यांचे १० हजारांपेक्षा सबस्क्रायबर आहेत. 

सरला यांनी आधी आपल्या भावाच्या मुलांना गोष्टी रेकॉर्ड करून पाठवत. कुटुंबीय आणि मित्रांकडून या उपक्रमाची मोठी वाखाणणी झाली. त्यांनी सरला यांना एक व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू करण्याचा सल्ला दिला. दर आठवड्यात एक गोष्ट रेकॉर्ड करावी, असेही सांगितले. सरलांनी व्हॉट्सअॅपवर ४० पेक्षा उर्वरित. ब्रॉडकास्ट ग्रुप सुरू केले आहेत. त्यानंतर गोष्टी पाठवण्याचा सिलसिला सुरू झाला. त्यांच्या या ग्रुपमध्ये तब्बल १० हजारांपेक्षा जास्त मोबाइल नंबर जुळले आहेत. यामुळे काही दिवसांनंतर सरलांचे व्हॉट्सअॅपच क्रॅश झाले. यानंतर त्यांनी टेलिग्राम या मेसेजिंग सेवेवर आपले अकाउंट सुरू केले. आता त्या मुलांना ‘बेड टाइम’ गोष्टी पाठवतात. सरलांचा हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे. मुलेही मेसेज पाठवून गोष्टी कशी वाटली, याचा फीडबॅक देतात. इतकेच नव्हे तर ही गोष्टीवाली आजी आता दुबई, ब्रिटन, अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियांसह अनेक देशांत लोकप्रिय झाली आहे. या आजीच्या गोष्टी वाचताना मुलांमध्ये खास उत्सुकता दिसून येते. 

मला प्रत्येक मुलाला आजीबाईची गोष्ट ऐकवायची आहे .... 
मी लहान असताना असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा मी आजीकडून गोष्ट एेकली नसेल. अंथरुणात शिरल्यानंतर मी मोठ्या उत्कंठेने आजीची वाट पाहत असे. या गोष्टींत हरवून डोळा कधी लागला तेही कळायचे नाही. त्याकाळी मोबाइल, लॅपटॉपसारख्या गॅजेट असण्याचा सवालच नव्हता. आता या वस्तू आपल्या हाती आल्या आहेत. मात्र, आता कुटुंबे लहान होत आहेत. आजी-आजोबांच्या ताेंडून गोष्टी एेकण्याची मजा क्वचितच एखाद्या मुलाला लाभत असावी. मुलांचे आपल्या आजी-आजोबांसोबतचे बंध सैल होत आहेत.
 
प्रत्येक मुलापर्यंत आजी-आजोबांच्या गोष्टी पोहोचवता येईल, असाच माझा प्रयत्न आहे. कारण हा त्यांचा हक्क आहे. मी मुलांच्या पालकांना ‘बेड टाइम स्टोरीज’ पाठवते, जेणेकरून ते मुलांना त्या एेकवू शकतील. यासाठी मी जगभरातील लोककथांवर संशोधन करते. प्रत्येक गोष्ट वाचते. नंतर पटकथा तयार करून त्याचे ध्वनिमुद्रण करते. तथापि या रेकाॅर्डेड गोष्टी थेट फॉलोअर्सना पाठवण्याआधी मी माझ्या पुतणीला पाठवते. तिच्या फीडबॅकनंतर या गोष्टी जगभरात सेंड केल्या जातात. सर्वसामान्य मुलांना सहजपणे समजतील, अशा पद्धतीने गोष्टींची निर्मिती आणि रेकॉर्डिंग करण्याचा माझा प्रयत्न असतो.
बातम्या आणखी आहेत...