आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन बॉक्समध्ये वाळू भरून विद्यार्थी \'फ्लिपकार्ट-अमेझॉन\'ला लावत होते चूना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांनी अटक केले आहे. दोघांवर अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याह्या मोहम्मद इशाक व मोहम्मद शाहरोज अन्सारी असे दोन्ही आरोपींची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, 'कॅश ऑन डिलिव्हरी' दोन्ही आरोपी अमेझॉन व फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन मागवायचे. डिलिव्हरी बॉयला एक जण बोलण्याच्या नादात अडकवायचा तर दुसरा पार्सल घेऊन एटीएममधून पैसे आणतो असे सांगायचा. बॉक्समधून स्मार्टफोन काढून त्यात तो वाळू भरून डिलिव्हरी बॉयला परत करायचा. डेबिट कार्डमध्ये रुपये नसल्याचे कारण सांगायचा.

दोन्ही आरोपींनी आतापर्यंंत अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटची फसवणूक करत महागडे स्मार्टफोन, लॅपटॉप व कॅमरे मिळवले आहेत. विद्यार्थ्यां विरोधात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

आरोपींनी आतापर्यंत मागवलेल्या महागड्या वस्तू कोणत्या?
- दोन्ही आरोपींनी आतापर्यंत अनेक महागड्या वस्तू मागवून शॉपिंग वेबसाइटची फसवणूक केली आहे. त्यात नेक्सस 6P गोल्ड मोबाइल फोन, मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन, सॅमसंग 6S एज, निकॉन डिजिटल कॅमेरा, लेनेवो लॅपटॉप व डीव्हीडीचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...