आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Suspected Terrorists Arrest With AK 47 From Gorakhpur

गोरखपूरमधून दोन \'मानवी बॉम्ब\' अटकेत; मुंबई स्फोटांसाठी दुबईतून मिळाली रसद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर - उत्तरप्रदेश एटीएसने दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना एके-47 रायफलसह अटक केली आहे. गोरखपूरमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेआधी एटीएसने मोठी कामगिरी केली आहे. मोदींच्या सभेत आत्मघातकी हल्ला करण्याची त्यांची योजना होती. पोलिस त्यांची कसुन चौकशी करीत आहेत. उत्तर प्रदेश एटीएसच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांच्या निशाण्यावर गोरखपूरसह वाराणसी देखील होते. दुसरीकडे पंजाबच्या फरीदकोट येथून पंजाब स्पेशल ऑपरेशन सेलच्या फरीदकोट छावणीतून एका क्लर्कला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपात अटक केली आहे. राजस्थानातून अटक केलेल्या वकासने पोलिस चौकशीत मुंबई स्फोट कसा घडवून आणला याचा खुलासा केला आहे.
मुंबई स्फोटांसाठी दुबईतून रसद
पाकिस्तानी दहशतवादी वकासने पोलिस चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. 2011 मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटांसाठी सहा हप्त्यांमध्ये दुबईतून हवालाच्या मार्गे पैसा आला असल्याचे त्याने सांगितले आहे. प्रत्येक हप्ता एक लाखांचा होता. दुबईतून रियाज भटकळने पैसे पाठवले होते. या स्फोटांसाठी 25 किलो स्फोटके मंगलोरहून पाठवण्यात आली होती. पोलिसांनी खुलासा केला, की वकासला वकास इब्राहिम या नावाने मुंबई आणि नबील अहमद या नावाने पुण्यात ओळखपत्र देण्यात आले होते. भायखळ्यातील एका खोलीत त्याने आयईडी तयार केले होते. आयईडीचा तो एक्सपर्ट आहे.
असा घडवून आणला स्फोट
12 जुलै 2011 रोजी वकास आणि यासिन भटकळने दोन स्कुटी चोरी केल्या होत्या. वकासने ऑपेरा हाऊस येथील गुजराती पापट स्टॉलजवळ बॉम्ब ठेवला होता. स्फोटांची बातमी त्यांनी त्यांच्या खोलीत इंटरनेटवर पाहिली. त्यानंतर दोघेही बिहारमध्ये पळून गेले होते.