आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Teacher Raped Mentally Restarted Girl For Six Months

गतीमंद विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांकडून तब्बल सहा महिने अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चरखी दादरी- हरियाणातील दुधवा गावात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील शाळेतील दोन शिक्षकांनी एका गतीमंद विद्यार्थिनीला आपल्या हवसचे शिकार केले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी शाळेत तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही आरोपी शिक्षकांना अटक केली आहे. रफीक आणि विनोद कुमार असे आरोपी शिक्षकांची नावे आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की दुधवा गावातील शाळेतील इय‍त्ता नववीच्या एका गतीमंद विद्यार्थिनीवर याच शाळेतील दोन शिक्षकांनी तब्बल सहा महिने अत्याचार केला. या सगळ्या प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनीला गर्भवती झाली होती. त्यानंतर अब्रु वाचवण्यासाठी तिच्या कुटूंबियांनी तिचा गर्भपात केला होता.
पोलिसांनी अल्पवयीन गतीमंद विद्यार्थिनीचा जबाब नोंदवून घेतला आहे. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी निर्मला श्योराण या उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षकांना तत्काळ प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे.