आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Terrorist Arrest By ATS In Ayodhya Latest News

अयोध्येत दोन आत्मघातकी हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात, वाराणसीत हल्ल्याची होती तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएस पथकाने अयोध्येतून दोन पाकिस्तानींना पकडले आहे. पोलिसांचा दावा आहे, की हे दोघेही आत्मघातकी हल्लेखोर आहेत. वाराणसीमध्ये निवडणूक प्रचार सभेदरम्यान हल्ला करण्याची त्यांची तयारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोघेही नेपाळ मार्गे भारतात आले. त्यांचे वय 20 ते 22 च्या दरम्यान असून ते पाकिस्तानच्या मुल्तानचे रहिवासी आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांनी अजून दोघांच्या अटकेची पुष्टी केलेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत दोघांनीही मान्य केले आहे, की त्यांना आत्मघाती हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते आणि भारतामध्ये निवडणूक काळात दहशत पसरविण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

दिल्ली एटीएसने दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दहशतवादी वकास आणि इंडियन मुजाहिदीनच्या म्होरख्या तेहसीन अख्तर ऊर्फ मोनूला अटक केली आहे. त्यांच्या तपासातच आत्मघाती हल्लेखोर भारतात आले असल्याचे समोर आले आहे. गुप्तचर संस्थांनी याआधीच निवडणूकी दरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.