आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम-मेघालय बॉर्डरवर लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
शिलाँग - आसाम-मेघालय बॉर्डरवर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी दोन कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. नॉर्थ गार्गो हिल्स जिल्ह्यातील या ऑपरेशन आधी मेघालय पोलिसांना दहशतवाद्यांबद्दलची गुप्त माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांकडून दोन परदेशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनूसार दहशतवादी जिमी उर्फ लकनू नॉर्थ-इस्टचा कुख्यात दहशतवादी होता. मेघालय पोलिस बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध घेत होती.
म्यानमार सर्जिकल स्ट्राइकनंतर लष्कर सतर्क
याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मणिपूरच्या चंदेल जिल्हात 6 डोगरा रेजिमेंटच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानतंर भारतीय लष्कराने शेजारी देश म्यानमारमध्ये सर्जिकल ऑपरेशन करुन अनेक दहशतवादी ठार केले होते. त्याची देशभर चर्चा झाली होती. तेव्हापासून लष्कर पूर्वोत्तर राज्यातील दहशतवाद्यांच्या हलचालींवर बारीक लक्ष्य ठेवून आहे.