आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: ट्रकच्या चाकात अडकली स्कूटी, महिला चालकाला मात्र खरचटलेसुध्दा नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रकच्या चाकांमध्ये फसलेली स्कूटी, इनसेटमध्ये स्कूटी चालक शालिनी
भिलाई - "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय भिलाई करांना नुकताच आला. झाले असे की, भिलाईमधील सुपेला चौकाजवळ बुधवारी एक दुचाकी १० चाकी ट्रकच्या खाली आली. वर दिलेल्या फोटोला पाहूनच तुम्हाला या अपघाताची तिव्रता दिसून येईल. मात्र सुदैवाने एवढ्या मोठ्या अपघातात दुचाकी चालवत असलेल्या शालिनी या महिलेस साधे खरचटलेसुध्दा नाही.
बऱ्याच प्रयत्नानंतर निघाली दुचाकी बाहेर
या अपघातानंतर ट्रकच्या आसपास जमा झालेले लोक ट्रकच्या खाली दुचाकी स्वाराला शोधण्यासाठी पाहायला लागले. विशेष म्हणजे स्वतः शालिनीसुध्दा त्या गर्दीसोबत ट्रकखाली पाहात होती. या अपघातातून वाचल्यामुळे तीने देवाचे धन्यवाद मानले. शेवटी बऱ्याच प्रयन्तांनंतर ट्रकच्या चाकात अडकलेल्या दुचाकीला काढण्यात आले.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, या अपघाताची संपूर्ण छायाचित्रे...