आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Woman Naxalites Surrendered, Accused Co Commanders Of Sexual Harrasment

शारीरिक भूक भागवण्यासाठीच नक्षलवाद्यांची महिला भरती - माओवादी कमांडरचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - छत्तीसगडमध्ये दोन महिला नक्षलींनी हत्यारांसह आत्मसमर्पण केले आहे. सुकमा येथील मलकानगिरी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांनी सहका-यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. दोन्ही महिला नक्षलवादी या मेला दलमच्या सदस्य असून एरिया कमांडर आणि उप एरिया कमांडर पदावर काम करत होत्या. दोघीही 2007 पासून नक्षलवादी कृत्यात सहभागी होत्या. त्यांच्याकडे असलेल्या 303 रायफल्स त्यांनी पोलिसांच्या हवाली केल्या आहेत.
दोन महत्त्वाच्या पदावरील नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याने त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळेल असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये सिमीच्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी नक्षलवाद्यांशी संपर्क करुन देशविघातक कृत्यांचे षडयंत्र रचले का याचाही शोध पोलिस घेत आहेत. यासंबंधातही आत्मसमर्पण करणा-या नक्षलींकडून माहिती मिळण्याची शक्यता आहे.
नक्षली महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना याआधीही घडल्या असून त्याबद्दल जाहीर वाच्यताही झाली आहे. एका महिला माओवादीने लिहिलेल्या 'एक माओवादी की डायरी' पुस्तकात सहकारी नक्षलवाद्यांसोबत संबंध निर्माण करण्यासाठी दबाव टाकला जातो असे लिहिलेले आहे. महिला नक्षलींनी नकार दिल्यास त्यांच्यावर अत्याचार केले जातात. एवढेच नाही तर नक्षलवादी सहका-यांच्या पत्नीवरही वाईट नजर ठेवतात. संघटनेमध्ये महिलांचा वापर शारीरिक भूख भागवण्यासाठीच केला जातो, की एखाद्या मोठ्या कारवाईसाठी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.