आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडोदराच्या दोन मुलींनीही आसारामवर लावले अत्याचाराचे आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - सुरतपाठोपाठ आता वडोदराच्या दोन मुलींनी आसाराम बापूंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. आसाराम बापूंनी त्यांच्यावर 2002-03 दरम्यान अत्याचार केल्याचे या मुलींचे म्हणणे आहे. दोन्ही मुलींनी आसाराम बापूंविरोधात गुन्हा नोंदवण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यापूर्वी 164 अंतर्गत दंडाधिकार्‍यांसमोर आपला जबाब नोंदवावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यालाच एफआयआर समजले जावे, असे त्यांचे म्हणणे आहे. या मुलींनी 2008 मध्येच आर्शम सोडला होता. अहमदाबादच्या अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांचे आसाराम बापूंबरोबर चांगले संबंध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या मुलींनी दंडाधिकार्‍यांसमोर जबाब नोंदवण्याची मागणी केली असल्याची शक्यता आहे.

या मुली प्रवचन ऐकण्यासाठी आर्शमात जात होत्या. यादरम्यान बापूंनी त्यांना मोतेरा येथील आर्शमात राहण्यास सांगितले. ते ऐकून मुली तेथे राहण्यासाठी गेल्या. अत्याचार झाल्यानंतर त्यांना आर्शम सोडायचा होता. पण त्यांना ते शक्य झाले नाही. आर्शम सोडण्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला.