आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Women\'s Prisoner Rape To Jail Inspector At Haryana

हरियाणात दोन महिला कैद्यांवर तुरुंग अधीक्षकाकडून बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- हरियाणामधील बल्लभगडच्या नीमका तुरुंगातील दोन महिला कैद्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तुरुंग अधीक्षक आणि उप-अधीक्षकांवर बलात्काराचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. दोन्ही अधिकारी दारूच्या नशेत महिला कैद्यांना मारहाण करतात. तसेच त्यांचे लैंगिक शोषणही केले जाते, असे पीडित महिला कैद्याच्या नातेवाईकाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडि़त महिला कैद्यांचे जबाब मंगळवारी कोर्टात नोंदवण्यात आले.

कोर्टाने संबंधित तुंरुग अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍याचे आदेश दिले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा दोन्ही अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पो‍लिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्माइलपूरमधील शिव कॉलनीतील रहिवासी ओमेंद्र यांनी 23 एप्रिलला महाअधीक्षक आणि पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून नीमका तुरुंगा अधीक्षकांविरूद्ध तक्रार केली होती.
ओमेंद्र यांचा भाऊ-वहिनींवर अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी सन 2008 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सन 2011 मध्ये त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांची नीमका तुरुंगा रवारणी करण्यात आली होती. ओमेंद्र गेल्या 17 एप्रिलला आपल्या भाऊ-वहिनीला तुरुंगात भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना हा सगळ्या प्रकार समजला होता. तुरुंग अधिकारी त्यांचा भाऊ आणि वहिनीवर अत्याचार करत आहे.

महाअधीक्षक यांनी ओमेंद्र यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा सत्र न्यायाधीश यांना पत्र पाठवले होते. डीजे आणि सीजेएम यांनी शनिवारी नीमका तुरूंगाचा दौरा केला होता. यादरम्यान तुरुंगातील दोन महिला कैद्यांवर तुरुंग अधिकार्‍यांनी बलात्कार केल्याचे समोर आले होते. त्यातील एक महिला चार वर्षांपासून तर दुसरी महिला पाच वर्षांपासून कारावास भोगत आहेत.

पीडित दोन्ही महिला कैद्यांनी सांगितले की, दोन्ही अधिकारी दारुच्या नशेत कैद्यांना मारहाण करतात. तसेच महिला कैद्यांचे लैंगिक शोषणही करतात. तुरुंगातील दोन महिला वार्डन अधिकार्‍यांना मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. चार वर्षांपासून तुरुंगात कैद असलेल्या महिलेने तुरूंग उप-अधीक्षकावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

मंगळवारी दोन्ही पीडित महिला कैद्यांना सीजेएम अमृत सिंग चालिया यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. तेथे दोघींचे जबाब नोंदविण्यात येऊन कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्‍याचेही आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार मंगळवारी रात्री उशीरा दोन्ही अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.