आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत दोन हजार तरुणांची कीर्तिध्वजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलसमेरी - कोचीची औद्योगिक वसाहत. येथील किन्फ्रा हायटेक पार्कमधील एक पाचमजली इमारत जगाचे लक्ष वेधून घेत आहे. चार मजल्यांत दोनशेवर तरुण लॅपटॉपमध्ये गुंतलेले असतात. त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या 70 कंपन्यांसाठी ते काम करत आहेत. स्टार्टअप व्हिलेज नावाच्या या इमारतीमध्ये जागेअभावी यांच्याशी संबंधित 650 कंपन्या संपूर्ण राज्यभर काम करत आहेत. कंपनी मालकांच्या हाती काही दिवसांत अभियांत्रिकीची पदवी पडेल. या अवघे सरासरी 22 वर्षे वयाच्या तरुणांकडे 220 कंपन्यांची मालकी आहे.

पाच अनुभवी तरुणांनी एकत्र येऊन नोकरीऐवजी कल्पना आणि संशोधनाच्या भांडवलावर कंपनी स्थापन केली. यातूनच स्टार्टअप व्हिलेज आकाराला आले. दोन वर्षांतच तरुणांनी देदीप्यमान यश मिळवले आहे. यासंदर्भात 29 वर्षीय असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट जेकब रोहन म्हणाला, या वर्षी आम्ही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये स्टार्टअप व्हिलेजचे सेंटर स्थापणार आहोत. गुगल, अ‍ॅपल, फेसबुक व अ‍ॅमेझॉनसारख्या नामवंत कंपन्यांची मुख्यालये या ठिकाणी आहेत. या कंपन्या दूरवरून सर्वकाही सांभाळतात. आम्हीही तेच करू.

या नेटवर्कशी संबंधित तरुण आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून कॉम्प्युटर व मोबाइलसाठी नवे अ‍ॅप व गेम डिझाइन करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड प्रतिसाद आहे. त्यांच्या ड्रॉड-आयडी नावाच्या उत्पादनाला ऑगस्टमध्ये डब्लिन परिषदेत पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे. तीन तरुणांनी स्थापन केलेल्या नेटारॉयड कंपनीचे हे यश आहे. ड्रॉड-आयडी उपकरण टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, रिमोट कंट्रोल, एसी किंवा अन्य उपकरणांशी जोडून त्यांच्या सेटिंगमध्ये बदल करता येऊ शकतो. तुम्ही कार्यालयातून बाहेर पडलात आणि घरातील खोली थंड करण्यासाठी एसीचे तापमान सेट करावयाचे असेल, तर तुम्हाला या उपकरणाचा उपयोग होऊ शकतो. घरी गेल्यानंतर तुमच्या अपेक्षेनुसार तापमान असेल.

संघर्षापेक्षा समजूतदारपणाने जोखीम

रोजची कमाई एक लाख रुपये
बिनॉय जोसफ, नीरज मनोहर
वय- 22 वर्षे
कंपनी-रियाफाई
वर्ष 2012. शिकत असताना कंपनी स्थापन केली. बिनॉय मेकॅनिकल इंजिनिअर आहे. नीरजचा विषय कॉम्प्युटर सायन्स होता. चार मित्रांना सोबत घेऊन सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर ‘कुक बुक0’ नावाचे अ‍ॅप तयार केले. ब्लॅकबेरी, अ‍ॅमेझॉन, प्ले स्टोअर आणि सॅमसंग गॅलेक्सी स्टोअरवर जगभरातील 60 लाख लोकांनी कुक बुक पाहिले आहे. दररोज 50 हजार लोक त्यास भेट देत आहेत. जाहिरातीतून कंपनीला दररोज दीड हजार डॉलरची कमाई होत आहे.
नोकरी सोडून ‘गेम’मध्ये गुंतले

जियो पॉल आणि जोस जॉर्ज
वय-24 वर्षे
कंपनी-पॉकेट क्रॉफ्ट्स
2014 मध्ये कंपनी स्थापन. दोघे मोबाइलसाठी गेम डिझाइन करत आहेत. आठ महिन्यांपूर्वी ‘स्वाइप ऑफ’ गेम बाजारात आणला. आतापर्यंत त्याचे 1 लाख 70 हजार डाऊनलोड झाले. रोज एक हजार युजर्स आहेत. विंडोज, अँड्रॉइडने पहिल्या पानावर जागा दिली. दुसरा गेम ‘द लाइन फुटबॉल’ गेल्या महिन्यात आला. ‘बॉक्स इट’ हा नवा गेम येत आहे. दोघांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी सुरू केली. मात्र, 6 महिन्यांत त्यांनी ती सोडली.

अ‍ॅप, केरळच्या वैशिष्ट्यावर

हेमा मोहन आणि पॉल मॅथ्यू
वय- 21 वर्षे
कंपनी- पुईसेंट इन्फो

2013 मध्ये पदवी मिळाल्याच्या दुसर्‍या दिवशी कंपनी स्थापन करून फूड ट्री अ‍ॅप डॉट कॉम वेबसाइट सुरू केली. आता फूड ट्री नावाचे अ‍ॅप डिझाइन करण्यात गुंतले आहेत. याच्या माध्यमातून पर्यटन आणि खाण्या-पिण्याची आवड असणार्‍या लोकांना एकाच ठिकाणी सर्व पदार्थांची माहिती मिळू शकेल. महानगरांना केंद्रस्थानी ठेवून बनलेल्या सुजोमोटो नावाच्या अ‍ॅपमधून त्यांना प्रेरणा मिळाली. हेमा आणि मॅथ्यू यांनी आपल्या अ‍ॅपमध्ये केरळची वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.
2006
त्रिवेंद्रम इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांनी मॉब मी नावाच्या कंपनीची सुरुवात केली. टेलिकॉम कंपन्यांना आपली सेवा सुरू केली.
2012
सरकारच्या मदतीने आयटी पार्कमध्ये स्टार्टअप व्हिलेज नावाचा एक प्लॅटफॉर्म स्थापन. नव्या कंपन्यांना आधार देण्याचे काम हा प्लॅटफॉर्म करतो.

2014
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका कंपनी प्रॉडक्टला टॉप 10 मध्ये स्थान मिळाले. आणखी एका कंपनीचे उत्पादन डब्लिन परिषदेत टॉप 10 मध्ये समाविष्ट.