आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • U.R. Anantamurty News In Marathi, Kannadi Literature, Divya Marathi

लेखणीचा दबदबा, वादामुळे चर्चेत राहणारा विचारवंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कन्नड साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि विपुल साहित्य संपदा निर्माण करणारे सिद्धहस्त लेखक म्हणून उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती यांचे नाव घेतले जाते. कथा, कविता, कादंबऱ्या, समीक्षात्मक लेखन अशा विविध प्रांतात त्यांनी लेखन केले. त्यातून त्यांच्या लेखनाचा, नावाचा दबदबा िनर्माण झाला.त्यांच्याभोवती वादाची वर्तुळे निर्माण झाली. कानडी साहित्यात त्यांनी नव्य (नवे) आंदोलन सुरू केले. त्यांच्या साहित्यात आधुनिकतेची झलक जशी दिसायची, तसे बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांचेही दर्शन व्हायचे. परखड लेखन, विचारशैली हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठळक पैलू होता.
वाद : अनंतमूर्ती आणि वाद यांचेही नाते तसे अतूटच होते. त्यांनी काही वर्षे राजकारणही केले. २००४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. पण ते अपयशी ठरले. भाजप व संघ परिवाराच्या ते विरोधात होते. लोकसभा निवडणुकीआधी मोदींच्या पंतप्रधानपदावरून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद तर ताजाच आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास आपण देश सोडून जाऊ, असे त्यांनी म्हटले होते. दुर्दैवाने त्यांच्या निधनामुळे हे विधान नियतीने त्यांच्याकडून अशा प्रकारे खरे करून घेतले.
सन्मान : १९८४ : प्रतिष्ठेचा जनपथ पुरस्कार { १९९८ पद्मभूषण { १९९४ ज्ञानपीठ पुरस्कार {२००८ नादोजा पुरस्कार, कन्नड विद्यापीठ { २०१२ कोलकाता विद्यापीठाची मानद डी. लिट.