आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘द महाभारत’ ठरणार भारतातील सर्वात महागडा सिनेमा, 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - संयुक्त अरब अमिरातीत वास्तव्यास असलेले भारतीय व्यावसायिक बी. आर. शेट्टी सर्वात महागड्या ‘द महाभारत’च्या निर्मितीत १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन जाहिरातपट निर्माते व्ही. ए. श्रीकुमार मेनन करतील. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एम. टी. वासुदेवन नायर यांच्या रंदामूझम कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे.  
 
भारतातील हा सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट ठरेल, असे सांगण्यात येते. २०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली द बिगिनिंग’चे बजेट १८० कोटी होते. जगातील सर्वात महागडा चित्रपट अवतारचा निर्मिती खर्च १५२९ कोटी होता. चित्रपट दोन भागांत बनणार असून सप्टेंबरमध्ये चित्रीकरण सुरू होईल. २०२० च्या सुरुवातीस चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्याच्या ९० दिवसांनंतर दुसरा भाग प्रदर्शित होईल.

चित्रपट निर्माता व अब्जाधीश बी. आर. शेट्टी यांच्या मालकीच्या कंपनीने ही माहिती दिली. कंपनीनुसार, इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलुगू आणि अन्य प्रमुख विदेशी भाषांमध्ये चित्रपट येईल. चित्रपटात अकादमी पुरस्कार विजेत्यांसह जागतिक सिनेक्षेत्रातील दिग्गज सहभागी हाेतील. यात बॉलीवूडसह हॉलीवूडमधील बडे कलाकार अभिनय करतील. हा चित्रपट खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया असेल, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.

३० देशांमध्ये शेट्टींचा व्यवसाय
बावागुथू रघुराम शेट्टी एनएमसी हेल्थ केअरचे संस्थापक व यूएई एक्स्चेंजचे चेअरमन आहेत. शेट्टी यांचा जन्म केरळमध्ये झाला. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात काम करताना त्यांच्यावर ५० हजार रुपये कर्ज झाले. कामाच्या शोधात ते अमिरातीत आले. मात्र काम मिळाले नाही. त्यावेळी डॉ. इस्माईल फहिमी यांनी संधी दिली. १९८० मध्ये एनएमसी निओ फार्मा कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी पहिले क्लिनिक सुरू केले. आता याचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले आहे. फोर्ब्जच्या यादीत समाविष्ट शेट्टींच्या कंपनीत ४० हजार कर्मचारी आहेत.

 
बातम्या आणखी आहेत...