Home | National | Other State | Udaipur Love Jihad Live Murder Video Accused Arrested Latest News In Marathi

लव्ह जिहाद- लाइव्ह हत्या: आरोपीला अटक, हत्येचा व्हिडिओही बनवून केला व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2017, 12:56 PM IST

येथे बुधवारी लाइव्ह मर्डरच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तो आपल्या स्कूटीवरून महादेव मंदिरात जात होता, तेवढ्यात पो

 • Udaipur Love Jihad Live Murder Video Accused Arrested Latest News In Marathi
  आरोपीने हत्येचा लाइव्ह व्हिडिओ शूट करून व्हायरलही केला.

  राजसमंद - येथे बुधवारी लाइव्ह मर्डरच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तो आपल्या स्कूटीवरून महादेव मंदिरात जात होता, तेवढ्यात पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी सावधगिरी म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. शहरासहित अनेक परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाइडवर

  पोलिस त्याची चौकशी करत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, राजसमंदमध्ये बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीपासून फक्त 700 मीटर अंतरावर शंभुलाल रैगरने 50 वर्षीय अफराजुल ऊर्फ भुट्टूची निर्घृण हत्या केली होती. त्याने याचा लाइव्ह व्हिडिओही बनवला होता.

  असे आहे पूर्ण प्रकरण..
  - पेालिसांनी आरोपीला राजसमंदमधील केलवा येथील रेगर गल्लीतून अटक केली. शंभुलाल रैगरने अफराजुलला मैत्रीचा हवाला देऊन शेतात नेले. तेथे पाठीमागून धारदार हत्याराने वार करून अफराजुलचा खून केला. मृतदेहावर पेट्रोल शिंपडून जाळण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, याचा लाइव्ह व्हिडिओही बनवला, नंतर तो व्हायरल केला.
  याठिकाणी त्याने 3 पानी पत्रही सोडले.

  - एसपी मनोजकुमार चौधरी म्हणाले की, व्हिडिओ शंभुलाल लव्ह जिहाद, देशभक्तीसहित अनेक मुद्द्यांवर भाषण ठोकताना दिसतोय. व्हिडिओत तो म्हणाला, तो आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेत आहे. व्हिडिओत मुलगीही दिसतेय. पोलिस याप्रकरणाला आपसातील वाद मानत आहे.

  मृत अफराजुल होता ठेकेदार
  - गृहमंत्री गुलाब कटारिया यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. पोलिस स्टेशन इंचार्ज रामसुमेर मीणा म्हणाले की, रैगर गल्लीतील रहिवासी शंभुलालने ही हत्या आपल्या शेतात केली. तेथे पं. बंगालच्या सय्यदपूर कालिचक मलादा हाल धोइंदाचा अफराजुल ऊर्फ भुट्टू (50) याचा मृतदेह 80 टक्के जळालेला आढळला. अफराजुल 20 वर्षांपासून राजसमंदमध्ये बांधकामाची ठेकेदारी करायचा.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित फोटोज व शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ

 • Udaipur Love Jihad Live Murder Video Accused Arrested Latest News In Marathi

  आरोपी लव्ह जिहाद म्हणत असला तरी पोलिस याला आपसातील वाद म्हणून पाहत आहेत.

  शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ

 • Udaipur Love Jihad Live Murder Video Accused Arrested Latest News In Marathi

  आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे म्हटले.

  शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ

 • Udaipur Love Jihad Live Murder Video Accused Arrested Latest News In Marathi

  शंभुलाल रैगर असे आरोपीचे नाव आहे

   

  पुढच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ

Trending